Monday, December 1, 2014

धो धो पाउस पडतोय. पाउस पडला की पब्लिक रोमॅंटिक होतं...


धो धो पाउस पडतोय. पाउस पडला की पब्लिक रोमॅंटिक होतं. सगळेजण म्हणतात भजी आणि चहा पाहिजे. लोक म्हणतात चांगली गाणी लावा. मग गाणी लावली की पब्लिक पाउस आहे म्हणून शांत गाणी लावा म्हणते. शांत गाणी बरेचदा उदास असतात. गझल फिजल. गझली हा प्रकारच उध्वस्त. संस्कृतात सगळीकडे सज्जन, दुर्जन , चंदन, गुलाब तर उर्दूत सगळ्यांचे प्रेमभंग आणि दारु. पावसात, चिकचिकीत कुठे जायचा कंटाळा येतो म्हणून नखरे सुचतात असले. प्रेम, देशभक्ती आणि थेअरी ऑफ रेलेटिव्हिटी हे पूर्णपणे कळाले आहेत का कुणाला? मागचे लिहिले तेवढे सेंटी वाक्य मी लिहीले आहे याच्यावर विश्वासच बसत नाहिये. प्रेम म्हणजे किल-बिल मधले बिल आणि बेट्रिक्सचे प्रेम, तेच खरे. देशभक्ती म्हणजे, मागच्याच्या मागच्या वाक्यात देशभक्ती शब्द टाकायलाच नको होता, उदाहरण आठवत नाही लगेच. लाईफमधे फंडे क्लिअर असणे फार महत्वाचे आहे. फंडे योग्य असोत किंवा अयोग्य, ते क्लिअर असणे महत्वाचे आहे. आपण बरोबर आहोत का चूक ते माहित असणेपण महत्वाचे आहे. बिलचे फंडे क्लिअर आहेत एकदम. तो म्हणतो - "बॅट्मॅन हा मूळात ब्रुस वेन आहे, स्पायडरमॅन हा मूळात पीटर पार्कर आहे. पार्कर, वेन यांना वेश चढवून स्पायडरमॅन, बॅटमॅन बनायला लागते. पण सुपरमॅन हा मूळातच सुपरमॅन आहे, त्याला वेश बदलून क्लॉर्क केंट बनायला लागते. हा महत्वाचा फरक आहे. तशी तू मूळातच नैसर्गिक असॅसीन आहेस..." आपल्या छोट्याश्या पोरीलापण मृत्यू समजावून ठेवला आहे बिलने. तडफडणारा मासा दाखवून. कंपनीमधे मलिक म्हणतो, "मैं चंदू नही हूं", श्रीनिवासन नंतर म्हणतो, "मैं भी चंदू नही हूं". हे सगळे असंबध्द आहे पण फंडे असे क्लिअर पाहिजेत माणसाचे. मातीचा वास वगैरेपण येतो पाउस पडल्यावर. त्याचा परफ्यूम काढायला पाहिजे, लय पैसा मिळेल. पाउस पडतोय बेक्कार, एक जोडी गाडीवरून जाताना दाखवायची - टेबल लॅंडटाईप कुठेतरी. स्म्म्म्म करुन श्वास घेवून, मातीचा वास मला आवडतो म्हणणार हिरॉईन. मग हीरो आयलव्हयू म्हणणार, समोर लगेच आपला परफ्यूम. मुलगी, जिंगल आणि परफ्यूमचा आकार योग्य असेल तर चालेल परफ्यूम. असेलच असा एखादा परफ्यूम बाजारात. पाणी बिळात भरते पावसाळ्यात म्हणून साप बाहेर येउन फिरत बसायचे चिपळूणला. इतकी वर्ष पाउस पडतोय, इतकी वर्षे बिळे बनतायत, सापांनी काहीतरी विचार केला असेल का? का अजुनपण चारपाच साप बुडुन मरतात? पुस्तकांचा वासपण आवडतो लोकांना. नवीन पुस्तकांचा चांगला येतो. किंडल ई बूक रिडर घेतला तर तो वास येणार नाही. किंडलच्या प्लॅस्टिकचा वास आवडेल की नंतर. रेनकोट आणि छत्र्या पण येतात लगेच. काय अर्थ आहे वर्षानुवर्षे छत्र्या, रेनकोट वापरण्याला? स्व-रुप पहा विश्वरुप नको, असा एक धडा होता विनोबांचा. त्यात एक राजपुत्र आणि राजा उन्हातून जात असतात. राजपुत्र म्हणतो चटके बसत आहेत पायाला, चामडे अंथरुया सगळ्या राज्यात जमिनीवर. राजा म्हणतो वेड्या त्यापेक्षा तु तुझ्या पायात चपला घाल. स्व-रुप पहा. राजपुत्र जे म्हणाला तेच जर एडिसन, आईनस्टाईन किंवा गांधीजी म्हणाले असते तर. त्याच धड्यात होते का हे? पावसाळ्यात सर्दी होते लगेच लोकांना. सर्दीचे एक आहे, कुठल्याही ऋतुमधे पन्नास टक्के लोकांना गाठतेच ती. इतके वर्षे सर्दी होत आहे माणसाला. कुत्रीपण शिंकतात कधी कधी. इतकी प्रगती झाली, एक साधी गोळी नसावी की जी घेतल्या घेतल्या घसा खवखवायचा बंद होईल, सर्दी जाईल पाचेक मिनीटांत. काहीपण घ्या ३-४ दिवस असतेच. पाउस बरा असतो, पिकांना पाणी , पोरांना होड्या etc. पावसाला लाच द्या. बेईमानी का धंदापण ईमानदारीत नाही. पैसा झाला खोटा ! * हे लिहायची काही गरज नव्हती खरे तर. नाव योग्य आहे ब्लॉगचे.

स्वभाव कधी बदलतो का?


स्वभाव कधी बदलतो का? कठीण प्रश्न आहे. पण विचार करा आणि स्वतःला प्रामाणिक पणे उत्तर द्यायचे म्हटले तर लक्षात येईल की मूळ स्वभाव कधीच बदलत नाही. वेळ प्रसंगी आपण त्याला मुरड घालून आपला स्वभाव बदलला आहे अशी स्वतःची समजूत घालून घेतो. प्रत्येकाचा स्वभाव जरी वेगवेगळा असला तरी एक गोष्ट मात्र प्रत्येकाच्या स्वभावात अगदी सारखी असते ती म्हणजे आपल्याला आपले कौतूक केलेले खूप आवडते. दोन वर्षाच्या चिंगी पासून तर ८० वर्षांच्या आजोबांपर्यंत. चिंगी, “तुझे बुटू किती छान आहेत गं “ , किंवा “तू किती सुंदर आहेस गं”.. म्हटले की चिंगी खूष होते,तसेच एखाद्या ८०वर्षाच्या आजोबांना तुमची तब्येत खूप छान आहे हो असे म्हंटले की ते खूश होतात.. थोडक्यात काय तर प्रत्येकालाच आपले कौतूक केलेले आवडते. आपले जे वागतो ते पण बरेचदा केवळ इतरांनी आपले कौतूक करावे , आपल्याला चांगले म्हणावे म्हणूनच असते . बायकोने स्वयंपाक केल्यावर ” छान झाली आहे भाजी” असे म्ह्टले की तिला भरून पावते, त्या पेक्षा जास्त तिची अपेक्षा पण नसते. ऑफिस मधे एखादे काम केल्यावर बॉस ने दिलेली कौतुकाची थाप नक्कीच सुखावून जाते .जर कोणी कौतुक करणारे नसेल तर काय फायदा हो कामं करण्याचा? कौतूक बरेचदा आपल्याला इतरांकडून हवे असते. आपल्या लोकांकडून नाही. नाही पटत?? उदाहरणार्थ घरात कळकट गाऊन घालून दिवसभर बसणाऱ्या बायका तयार होतात ते केवळ बाहेर निघतांना, कौतुकाची नजर हवी असते ती बाहेरच्या लोकांकडून नवऱ्याकडून नाही, आता काही स्त्रिया म्हणतील, की नवऱ्याच्या कौतुकाच्या नजरेत स्वार्थ दिसतो :) असो.. विषयांतर होतंय. मी हे लिहितोय म्हणजे मी पण काही वेगळा नाही. मला पण कौतूक खूप आवडते. मग ते अरे बारीक झालास रे थोडा. असे जरी कोणी म्ह्टले तरी मला आनंद होतो. ब्लॉग वर पण काही तरी लिहिल्यावर कौतूक व्हावे असे वाटत असतेच, किंबहूना मी लिहितो ते पण केवळ माझे कोणी तरी कौतूक करावे म्हणूनच! केवळ याच कारणासाठी आपण काही लिहिले की ब्लॉग ची लिंक मी चार – दोन गृप मधे आणि स्वतःच्या भिंतीवर लटकवत, सोबतच ही जाहिरात नाही हे बिरुद चिकटवायला पण कमी करत नाही जर एखाद्या व्यक्तिने आपल्या लेखाचे अपेक्षे प्रमाणे कौतूक केले नाही की मग थोडी चाहूल घेतो, की ह्याने लेख वाचला की नाही आपला? नाही असे वाटले तर लिंक मेल करतो. नंतर तरीही त्याची रिऍक्शन आली नाही तर फोन करून विचारतो , ” की काय रे लेख वाचला की नाही?” बरेचदा तर मित्रांच्या पोस्ट वर आपल्या लेखाची लिंक पोस्ट करून इतरांच्या फेसबुक भिंती रंगवण्याचे कामही मी कधी कधी करत असतो. आपण लिहिलेला एखादा जुना लेख आपल्यालाच खूप आवडलेला असतो, पण त्या लेखाचे फारसे कौतूक झालेले नसते, किंवा कोणी “लेख जमलाय बरं का” असेही फारसे म्हटले नसते, तोच लेख पुन्हा पुन्हा फेसबुक मधे मित्रांच्या भिंतीवर चिकटवून खरंच लेख जमलाय की नाही याची चाहूल घेण्यासाठी नाही तर कौतूक करून घेण्यासाठी पोस्ट करतो मी बरेचदा. म्हणजे काय, कौतूक व्हावे म्हणून लिहितो मी. आत्म समाधान किंवा मला वाटतं म्हणून मी “काय वाटेल ते “लिहिले असते, तर कौतुकाची अपेक्षा केली असती का? एखादा लेख कोणी वाचला नसेल तर ” अरे माझा तो लेख वाचलास की नाही?” असे विचारून त्याने वाचे पर्यंत पाठपुरावा म्हणजे माझा लेख वाच आणि माझे कौतूक कर, छान झालाय म्हण” ही आंतरिक इच्छा लपवून …………….! किती दांभिक पणा नाही का ? हे आयुष्य आहे ते आपण जगतोय ते केवळ पाठीवरच्या कौतुकाच्या थापे साठी! लहान मुल जेंव्हा स्वतःच्या पायावर पहिल्यांदा उभे रहाते, तेंव्हा आई नजरेतले कौतुक त्याला नक्कीच समजते. शाळेत सरांनी केलेले सुंदर हस्ताक्षरा बद्दलचे कौतूक , एखाद्या मैत्रिणीने अरे वा.. मस्त आफ्टर शेव्ह आहे रे म्हणून केलेले कौतूक, नवीन बाईक घेतल्यावर नाक्यावर बाईक घेऊन गेल्यावर मित्रांनी केलेले बाईकचे कौतूक, लग्न झाल्यावर बायको सोबत बाहेर निघाल्यावर नातेवाईकांनी/ मित्रांनी बायकोचे केलेले कौतूक, मुलीचे इंजिनिअरींग पुर्ण झाल्यावर जसे काही आपणच काही तरी मिळवले आहे असे समजून स्वतःचे करून घेतलेले कौतूक…. असे अनंत प्रकार आहे. शेवटी काय तर ह्या आयुष्याचा सगळा पायाच ह्या कौतुकावर अवलंबून आहे. लेख लिहिलाय बरेच दिवसापूर्वी पण पण पोस्ट करायची इच्छा होत नव्हती. आज सहज ड्राफ्ट चेक केले तर

कशी मुलगी पाहिजे?


कशी मुलगी पाहिजे? तसा फारच सोपा वाटणारा प्रश्न आहे. उत्तर तितकंच अवघड. हा प्रश्न आम्हाला कोण विचारतं, कधी विचारतं त्यावर आमचं उत्तर अवलंबुन असतं. म्हणजे आईनी रविवारी दुपारी मस्त आम्रस-पुरीचं जेवण झाल्यावर विचारलं की आमचं उत्तर असतं, "असंच मे महिन्यात रविवारी दुपारी आम्रस-पुरी जेवायला घालणारी मुलगी पाहिजे." पण जरा serious उत्तर द्यायचं झालं, तर आईला दाखवायला घरी घेऊन जाण्यासारखी ideal पोरगी जशी असते - शांत, सोज्वळ ("सोज्वळ" अशा पोरी आणि पोरं आता अस्तित्वातच नसतात), सगळ्यांशी मिळुन-मिसळुन राहणारी, घरातलं आणि बाहेरचं उत्तमरित्या सांभाळणारी, घरातल्या थोरल्यांचा मान राखणारी, लहानांचे लाड पुरवणारी, सणासुदीला उत्साहानी पुढाकार घेणारी, ई. हे सर्वोत्तम उत्तर असतं. थोडक्यात म्हणजे काय, ही मुलगी म्हणजे 'बायको कॅटेगरी'! जवळच्या नातेवाईकांनी विचारलं की तेव्हा थोड्याफार फरकानी आईला दिलेलं उत्तरातली 'बायको कॅटेगरी' उपयोगी पडते. हं म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या लग्नात गेल्यावर आईच्या मावशीच्या पुतण्याच्या आत्यच्या नव्वदीच्या पुढच्या सासुनी विचारलं तर जोरात त्यांच्या कानात जाऊन म्हणायचं, "घरातल्या देवाची पुजा तिनी मनोभावानी करायला पाहिजे, आणि रविवारी दुपारी जेवण झाल्यावर आमच्या आजीचे पाय चेपुन द्यायला पाहिजे - अशी मुलगी मला हवी आहे!" ~"मिळेल हो, नक्की मिळेल!" असा आशीर्वाद हमखास मिळतोच! मित्रांपैकी कुणी विचारलं की उत्तर 'बायको कॅटेगरी' (BC) वरुन 'अप्सरा कॅटेगरी' (AC) मधे बदलतं. शेवटी लग्न करायचं असतं म्हणुन 'माल कॅटेगरी'तली मुलगी कितीही आवडली तरी लग्न AC किंवा BC शीच करायचं असतं. 'अप्सरा कॅटेगरी' म्हणजे रोमन हॉलिडे मधली अतिशय ग्रेसफुल आणि रॉयल दिसणारी ऑड्रे हेपबर्न, किंवा 'जाने क्यों लोग प्यार करते हैं' अशा सुंदर खळीतुन प्रेमात पाडणारी प्रिटी झिंटा, किंवा 'पल, पल, हर पल' मधे आपल्याकडे हर पल प्रेमाच्या अपेक्षेने पाहणारी विद्या बालन! चुकुन जर हे AC-वालं उत्तर आईला दिलं की, "अरे! जमिनीवर उतर! स्वत:कडे पाहिलं आहेस का कधी आरशात? अरे, त्या फक्त सिनेमात असतात. खरं आयुष्य खूप वेगळं असतं!" सगळ्यात अवघड परिस्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा एखादी मैत्रिण असा प्रश्न विचारते. कशी मुलगी पाहिजे? तिला पण बिन्दास्त AC-वालं उत्तर देऊन टाकायचं. मित्राला 'AC' म्हट्लं की पटकन समजतं, पण मैत्रिणीला त्यातले बारकावे पाहिजे असतात. मग ते बारकावे सांगीतले, की ती तिची कोण एक 'जवळची' मैत्रिण ती तुम्हाला सुचवते. मग स्वत:हूनच सांगते, 'ती तशी छान आहे, पण अप्सरा नाहीये रे... साधीच आहे...' (म्हणजे तुमचा शोध पुन्हा सुरु) किंवा 'अरे! अगदी अप्सरा आहे! ऐश्वर्याच!' (अशी शक्यता जवळ-जवळ शून्य असते - तुम्हाला भेटेपर्यंत सलमान, विवेक नाहीतर अभिषेकचा नंबर आधीच लागलेला असतो) म्हणजे एवढं सगळं करुन उपयोग काहीच नाही!! :-((( अप्सरा आणि बायको कॅटेगरी दोन्ही वेगवेगळ्या असतात का? Can I not have best of both the worlds? आम्हाला कशी मुलगी पाहिजे? 1) सर्व प्रथम म्हणजे ती हुशार, confident आणि independent पाहिजे - ती कशी ओळखायची? ह्या करता "हीथ्रो टेस्ट" वापरायची. समज ती मुलगी हीथ्रो एरपोर्टवर एकटीच मागे राहिली. तर हीथ्रो वरुन तिला एकटं घरी येता आलं पाहिजे. मग आमचं घर लंडन मधे असो, मुंबई मधे असो, किंवा झुमरीतलैय्या मधे! तिला तिथे एकटं येता आलं पाहिजे! म्हणजे ही टेस्ट करायाला आम्ही तिला मुद्दामुन एकटं नाही सोडणार, पण मुद्दा हा आहे की ती तेवढी हुशार, confident आणि independent पाहिजे. २) दुसरं महत्त्वाचं म्हणजे तिला मस्त चहा करता आला पाहिजे. स्वयंपाक जमला, नाही जमला तरी चालेल. पण रोज सकाळी एक कप, आणि संध्याकाळी घरी परत आलं की एक कप असा तिच्या हातचा बुंगाट चहा मिळाला, तर स्वर्ग-सुखच लाभलं असं समजायचं. आणि चहा बरोबर तिला मस्त गप्पा मारता आल्या पाहिजेत! ३) आम्हाला लग्नात हुंड्यात ३ नव्या गाड्या पाहिजेत - एक काळी BMW, एक सिल्वर मर्सिडीज, आणि एखादी तिच्या आवडीची - ह्या सगळ्या गाड्या Leo Mattel कंपनीच्याच पाहिजेत, आणि आकार इतका मोठा पाहिजे की त्यातली प्रत्येक गाडी आमच्या तळहातावर मावली पाहिजे! म्हणजे काय की आमच्या घरच्या शोकेस मधे त्या गाड्या पार्क करता येतील. शोकेस मधे आमच्या बालपणातल्या इतर गाड्या आहेत, आणि आताच्या जगात पार्किंगच्या जागेचा इतका अभाव आहे, त्याला आम्ही तरी काय करणार? ४) आवडतं पुस्तक आणि सिनेमाबद्दल विचारलं की तिनी पहिलंच उत्तर 'प्राईड आणि प्रेजुडाईस' आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सोडुन काहीही सांगितलेलं चालेल. "चंपक / चांदोबा" आणि "डॉक्टर कोतनीस की अमर कहानी" हे उत्तर पण चालेल! अहो, जशी आमची अप्सरा अस्तित्वात नाही तसाच तो जेन ऑस्टेनचा "मिस्टर डार्सी" आणि शाहरुखचा "राहुल" फक्त पुस्तकात किंवा सिनेमा विश्वातच सापडतो हो! ५) तिला आमचं टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन, बास्केटबॉल ह्या खेळांबद्दलचं असीम प्रेम चाललं पाहिजे - तिला पण हे खेळ आवडत असतील, तर उत्तमच! खेळता येत असतील तर absolutely nothing like it! ६) तिला फ्रेंच येत असेल तर लई भारी, कारण फ्रेंच इतकी romantic भाषा नाही. आमच्या तुटक्या-फुटक्या फ्रेंचचे शब्द तिला एखाद्या शायरी किंवा प्रेमगीतातले भासले पाहिजेत. अहो शेवटी म्हणतात ना, "nothing else, but an honest intent matters". ७) आम्हाला salsa, jive हे नृत्य प्रकार येत नाहीत, पण शिकायची तीव्र इच्छा आहे. तिला येत असेल, तर आम्हाला शिकवायचं, किंवा आमच्या बरोबर शिकण्याची तयारी पाहिजे. नाहीतर आमचा भगवान स्टाईल गणपती डान्स चालला पाहिजे. ८) हिंदी सिनेमा बद्दलचं आमचं अफाट वेड तिला पटलं पाहिजे. अमिताभ, राहुल देव बर्मन, रेहमान , गुल्जार, किशोर हे आमचे दैवत आवडत नसतील तर निदान बघायची/ऐकायची तयारी पाहिजे. अधुन-मधुन आम्हाला गोविंदा आणि हिमेश पण आवडतो. (आधीच सांगितलेलं बरं!) ९) आमचं आयुष्यभराचा एकमेव मौल्यवान खजिना म्हणजे आम्ही बालपणापासुन जमवलेली पुस्तकं. आमच्या खोलीतल्या प्रत्येक कपाटात, बॅगेत, पलंगाखाली, डेस्कवर, बॉक्स मधे, माळ्यावर, फरशीवर, नजर जिथे जाईल तिथे आमचा खजिना पसरलेला आहे. त्या खजिन्याबद्दलचं आमचं प्रेम तिला पण असावं, नाहीतर "काय ही रद्दी जमा केली आहे" असले विधान आम्ही खपवुन घेणार नाही. १०) सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही पत्रिका पाहतो. आम्हाला मुलगी फक्त "हास्य" राशीची पाहिजे. आणि तिचा रक्तगट कोणताही असु दे, पण attitude मात्र 'B+' पाहिजे. चला, आजच आमच्या मातोश्रींना ही १० गुणांची यादी आम्ही कळवतो. म्हणजे त्यांना शोधायला बरं. आणि तुमच्या पैकी कोणाला ह्या "अप्सरा + बायको" कॅटेगरीत मोडणारी एखादी मुलगी माहिती असेल, तर आम्हाला त्वरीत कळवावे, म्हणजे पुढच्या बोलणीला सुरुवात करता येईल. तो पर्यंत आम्ही गुल्जार भाईंच्या नविन गाण्यावर झूम बराबर झूम करत बसतो, धागे तोड लाओ चांदनी से नूर के, घुंघट ही बना लो रौशनी से नूर के, शर्म आ गयी तो आघोष में लो, हो सांसों से उलझी रहें मेरी सांसें, बोल ना हलके, हलके बोल ना हलके, हलके...!!!!!!!!!!!!!!

वाढदिवशी आनंदीच रहायला हवं हा नियम असूनही मोठय़ानं भोकाड पसरावं असं का वाटतंय मला.?


वाढदिवशी आनंदीच रहायला हवं हा नियम असूनही मोठय़ानं भोकाड पसरावं असं का वाटतंय मला.? रात्री बाराच्या ठोक्याला मेसेजेस.संध्याकाळी भेटणारच सगळे. ते माझ्यासाठी ब्लॅकफॉरेस्ट आणणार, मेहुल एक पार्कर देईल. सानिका हॅपी बर्थडे लिहिलेला मग देईल. चुकून राहून गेलेलं प्राईस टॅग सगळ्यांसमोर काढत निमिष रिस्ट वॉच देईन, वर्षा एक डेअरी मिल्क देईल. मुलींवाला एक लूक थ्रो करत म्हणेल ‘किती महाग गिफ्ट देतोय त्यापेक्षा किती मनापासून देतोय, दॅट मॅटर्स.’मग मॅकडी मधे हॅपी बर्थडे टू यू.हे सगळं असंच होतं!पण हे मला का माहितीये.?हे तर सरप्राईज आहे.मी ‘सरप्राईज’ने चकीत व्हायलाच हवं. इट्स माय बर्थ डे टुडे. मी खूप एक्साईटेड नसलो तरी ‘अरे माझ्या लक्षातच राहत नाही माझाच वाढदिवस’ असं माझं काही नाहीये. माझ्या लक्षात आहे माझा वाढदिवस आणि तुषार, मह्या, अवि, सानिका, मेहुल, वर्षा, स्वाती, निमिष, तन्वीर, फैजल याही सगळ्यांच्या लक्षात आहे. फेसबुक यायच्या आधीपासून. म्हणजे मी विसरलो नाहीये, इतकंच. आणि तेही विसरले नाहीयेत. रात्री बाराच्या ठोक्याला यातल्या तिघींचे एकाच वेळी मेसेजस आले मला..‘सो, आय विश यू फस्ट राईट?’ मी ‘येस ऑफकोर्स.थॅँक्स’ असा रिप्लाय केला, तिघींनाही. आणि आता दुपारी बारालाही माझा व्हाट्सअपचा मेसेंजर दर पंधरा-वीस मिनिटांनी खणखणतोय. पण तरीही तो बंद करून ठेवावासा नाही वाटत. मग चार-पाच फोन आणि दोन-तीन व्हच्यरुअल ग्रीटिंग काडर्स. आता उठायला हवंय. संध्याकाळी भेटणार आहोत सगळे. ते माझ्यासाठी ब्लॅकफॉरेस्ट आणणार मॉन्जिनिसमधून. मेहुल एक पार्कर देईल. सानिका हॅपी बर्थडे लिहिलेला मग देईल. निमिष रिस्ट वॉच देईन, चुकून राहून गेलेलं प्राईस टॅग सगळ्यांसमोर काढत. वर्षा एक डेअरी मिल्क देईल. आणि निमिषकडे एक मुलींवाला लूक थ्रो करत म्हणेल ‘किती महाग गिफ्ट देतोय त्यापेक्षा किती मनापासून देतोय, दॅट मॅटर्स.’ मग मॅकडीमध्ये हॅपी बर्थडे टू यू ची ट्यून वाजेल साडेसात सेकंद आणि एक अख्खा मिनिट मी केकने माखलेला स्वत:चा चेहरा उगाच वॉशरूमच्या आरशात न्याहाळत बसेन. पण मला आता यातलं काहीच माहीत असायला नको, म्हणजे ते मला एक प्लिझण्ट सरप्राईज असेल. असावं. हे सारं असंच होतं, होणार हे माहीत असूनही मी ‘सरप्राईज’ने खूश व्हायला पाहिजे. खोलीचं दार उघडून मी बाहेर येतो. दुधाचं भांडं उघडंच राहून गेलंय. राकेशला आज मॉर्निंग शिफ्ट. त्यामुळे तो सातलाच बाहेर पडला असणार. पार्थ आजही केर बाहेर ठेवायला विसरलाय. ‘सॉरी भाई, वॉज इन हरी, हॅपी बर्थडे, एन्जॉय यूवर डे. ओट्यावर खरडून ठेवलेलं खडूने मध्यभागी. जीव खाऊन तीनदा खसाखसा पुसून काढला ओटा तरी पुसट पांढर्या रेषा दिसत राहिल्याच. अंथरूणावर अस्ताव्यस्त पसरलेली सिगरेटची थोटकी तशीच राहू देत.अनुषा भयंकर कातावते हे पाहून. ‘व्हाय यू गाईज हॅव टू बी सो प्राऊड पिग्ज?’ पण आता तीसुद्धा बंगळुरुलाय. भल्या पहाटे आठला तिचा फोन आला. ‘हाय बेबी, हॅपी बर्थडे! लव्ह यू.मुआऽऽ.’ हेच दोन-तीनदा क्रम बदलून म्हटलं तिने आणि फोन ठेवून दिला. नवाकोरा जॉब आहे त्यामुळे जरा एक्साईटेड असेल असं स्वत:ला समजावत मी पाकिटातली शेवटची सिगरेट शिलगावतोय. खिडकीतून एक छोटासा कवडसा आत शिरून बसलाय. त्या कवडशात मला माझा इवला धूर खोलीभर उंच आणि मोठ्ठा वाटतोय. त्याच्याकडे एकटक वगैरे बघत बसायचं मी फक्त! चिडचिड नाही करायची आजच्या दिवशी असं मी दरवर्षी ठरवतो. बट आय फिल इरिटेड यार! कालचा दिवसच आजही आहे आणि तोच उद्याही असणारे. तरीही याच दिवशी फेसबुकवर नको जायला, फोन नको उचलायला, खोलीतून बाहेर नको यायला, अंघोळ नको करायला, संध्याकाळी बाहेर नको जायला असं सगळं एकदम, एकाच वेळी खूप तीव्रतेने का वाटत असतं? अशाच वेळी नेमकी पाकिटात एकच सिगरेट का शिल्लक राहते? आणि मग एक तरी का राहते? जुलैमध्ये एकही सुट्टी का नसते? तरीही जुलैमध्येच का येतो माझा बर्थडे? दिवाळीत, ख्रिसमसला, गणपतीत, आंब्याच्या सीझनमध्ये, २९ फेब्रुवारीला असा का येत नाही? मला आई कधीच चॉकलेटस् का द्यायची नाही वाटायला शाळेत? ‘टीचर इट्स माय बर्थडे टुडे’ असं सांगूनही टीचर बाहेर उभं का करायच्या? ‘तू ओरडत जा ना त्यांना’ असं आईला सांगायचं ठरवून घरी येताच बेल वाजवल्यावर आजही आमच्या मावशीच का दार उघडायच्या? आजसुद्धा त्या माझ्यासमोर बोर्नव्हिटाचाच मग आदळायच्या ‘लवकर लवकर पी’ असं खेकसतच. आणि मुख्य म्हणजे आठव्या वाढदिवसाला पहिल्यांदा पडलेले हे प्रश्न पंचविसाव्या वाढदिवसापर्यंत छळत आलेत सतत चढत्या भाजणीत? पार्थने एव्हाना पार्कर घेतला असेल. ब्लॅकफॉरेस्टवर माझं नाव पेस्ट्रीफाय होत असेल. माझ्यासाठी म्हणून सगळे सरप्राईज प्लॅन करताहेत. पण अशा कशानेही मला सरप्राईज होताच येणार नाहीये याचा आज मला माझ्या वाढदिवशी चार वाजून छप्पन्नाव्या मिनिटाला अतोनात त्रास होतोय. निदान हे बघायला तरी कोणीतरी असायला हवं होतं इथे. हे सगळं असं घडायलाच नको होतं.... पण घडतं असंच, माहित असलेल्या सरप्राईजसारखं.ते सरप्राईज काय हे माहिती आहे, तरीही या ‘आय विश’ खेळाचा मोह आवरता येत नाहीये.

"वपुर्झा" न वाचलेला साहित्यप्रेमी विरळाच


श्री. व.पु. काळे यांचे कथाकथन न ऐकलेला, "वपुर्झा" न वाचलेला साहित्यप्रेमी विरळाच ! आज आपल्यासाठी "वपुर्झा " मधील काही उतारे देत आहे. आपल्या मनातील विविध विषयांवरील विचार जसे आहेत तसे, उगाच कसलाही मुलामा न देता व्यक्त केले आहेत वपुर्झा मध्ये. हा थेटपणा, हा खरेपणा, हा सरळपणा हेच वपुर्झाचे वेगळेपण ! आपले विचार व्यक्त करण्यासाठी आजकाल आपण "ब्लॉग " वापरतो पण व.पु.नी "वपुर्झा" द्वारे फार पूर्वीच ही कल्पना हाताळली होती असे वाटते मला, फक्त त्यावेळी इंटरनेट नव्हते म्हणून !!! ------------------------------------------------------------------------------------------------ "माणसाला काही न काही छंद हवा. स्वप्नं हवीत. पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वत:ला हरवायला शिकतो. सापडायला शिकतो. हे " हरवणं-सापडणं " प्रत्येकाचं निराळं असतं. पती-पत्नीचं एकंच एक मत असलं तर संसारात स्वर्ग निर्माण होतो. पती-पत्नीच्या ह्या हरवण्याच्या-सापडण्याच्या जागा एकाच निघाल्या तर ते सुख-दुखा:चे समान वाटेकरी होतील. दोघांच्या अशा जागा किंवा स्वप्नं वेगवेगळी असतील, तर प्रकृतीधर्मानुसार ते स्वाभाविक आहे, पण तो एकमेकांच्या टिंगलीचा विषय होऊ नये इतपत भान संसारात ज्यांना टिकवता येईल, त्यांना संसारसुखाचं मर्म सापडलं. ज्यांना हे असं हरवता येत नाही, ते रिकाम्या वेळेचे बळी ठरतात. रिकामा वेळ सैतानाचाच." ------------------------------------------------------------------------------------------------ अक्षता ह्या शब्दातलं प्रत्येक अक्षर महत्वाचं आहे. अ = अर्पणभाव क्ष = क्षमाशीलता ता = तारतम्य हे तीन गुण दोघांजवळ हवेत. प्रेमातील नवी नवलाई आता काहीशी कमी झाली असेल तर दोघांनी आपापल्या डोळ्यांवरच्या पट्ट्या उतरवाव्यात. एकमेकांच्या वृत्तीचा खरा मागोवा घ्यावा. सप्तकातले किती सूर जुळतात ते भाबडेपणा टाकून तपासावं. मुख्य म्हणजे एकमेकांसाठी आपण कोणत्या गोष्टींना, किती प्रमाणात मुरड घालू शकणार आहोत त्याचा ह्याच कालावधीत शोध घ्यावा. संघर्षाच्या जागा हेरून ठेवाव्यात. मुरड घालणं हा सहजधर्म व्हायला हवा. कात टाकली कि साप तिकडे वळूनही पाहत नाही, इतक्या सहजतेने आपण एकमेकांसाठी काय टाकू शकतो, त्याचं संशोधनचं करायला हवं. एकमेकांना टाकण्यापेक्षा, एकमेकांसाठी काही ना काही टाकणं ह्याला अर्पणभाव म्हणतात. स्वत:तल्या उणिवांची खरी जाणीव झाली आहे, दोष समजले आहेत, कमकुवतपणाच्या जागा समजल्या आहेत पण प्रामाणिक प्रयत्न करूनही आपल्या जोडीदाराचे वृत्तीदोष जात नाहीत समजल्यावर तिकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती म्हणजे क्षमाशीलता. तरतमभाव न बाळगता घ्यायचं कसं आणि लडिवाळ हट्ट करून वसूल कधी करायचं, वाकायचं कधी आणि कधी वाकवायला लावायचं, स्थळ, काल, स्थिती यांचं भान म्हणजे तारतम्य. " ------------------------------------------------------------------------------------------------ " आयुष्यातले आनंदाचे अनेक क्षण, उपेक्षेचे हुंदके, दुखा:चे कढ आणि आवर घातलेले आवेग-हे ज्याचे त्यालाच माहीत असतात. एखादा तरी साक्षीदार अशा उन्मळून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा ह्यासारखी इच्छा पुरी न होणं ह्यासारखा शाप नाही, पण साक्षीदार मिळून त्याला त्यातली उत्कटता न कळणं यासारखी वेदना नाही. त्यापेक्षा एकलेपणाचा शाप परवडला. "

कार्पोरेट ट्रेनिंग


हल्ली बरेचदा कार्पोरेट ट्रेनिंग अटेंड करावे लागते, आणि मग त्या ट्रेनिंगच्या दरम्यान ऐकलेल्या काही गोष्टी अगदी मनात घर करून बसतात, तर काही अगदी त्याच दिवशी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिल्या जातात. तर अशीच ही एक गोष्ट, मला आवडलेली आणि लक्षात राहिलेली , तशी ही गोष्ट सांगितल्या गेली होती वेगळ्याच संदर्भात, पण मला मात्र लक्षात राहिली ती वेगळ्याच संदर्भात .जपान मधे सुशी नावाचा एक पदार्थ खूप प्रसिद्ध आहे असे. हा पदार्थ बनवण्यासाठी एकदम ताजे फडफडीत मासे वापरले जातात. कच्चे मासे असल्याने, ते अगदी ताजे असणे महत्त्वाचे असते. प्रत्येक बोटीवर पकडलेले मासे ठेवण्यासाठी एक जागा असते. मासेमारी साठी जातांना त्या रिकाम्या जागेत बर्फ भरून नेला जातो आणि त्या बर्फात ठेऊन मासे आणले तर तर मासे डिकंपोझ होत नाहीत, म्हणून बर्फात ठेऊन आणण्याची पद्धत आहे. तर एका जपानी कोळ्य़ाने आपला सेल वाढवण्यासाठी एक युक्ती केली. समुद्रावर जातांना इतर कोळी बर्फाच्या लाद्या भरून न्यायचे त्याने तीच जागा मॉडीफाय करून त्या जागी पाणी भरून त्या पाण्यामध्ये पकडलेले मासे ठेऊन आणणे सुरु केले. माशांना पुरेशी हवा मिळावी म्हणून ती पण सोय केली. समुद्र किनाऱ्यावर पोहोचे पर्यंत ते सगळे मासे अगदी संथ पणे पडून रहायचे पाण्यात पण जिवंत रहायचे. जिवंत माशांना नक्कीच जास्त पैसे मिळायचे . पण….. एका पंचतारांकित हॉटेल मधल्या शेफ ने कम्प्लेंट केली या माशांची चव काही फार चांगली लागत नाही. मासे जरी जिवंत असले तरीही ते मेल्यातच जमा आहेत. अजिबात काही अॅक्टिव्हिटी नाही , काही नाही त्या मुळे त्यांच्या जिवंत पणाला पण काही अर्थ नाही. सुशी मधे काही खास चांगली चव लागत नाही या माशांची! त्या कोळ्य़ाच्या मनात विचार आला की आता काय करावं? त्याने एक नवीन युक्ती शोधून काढली, मासे पकडल्यावर त्याने त्या माशांच्या टाकी मधे एक बेबी शार्क पण टाकला. त्या शार्क ने आपल्या सवयी प्रमाणे त्या टाकी मधे पण इकडून तिकडे पोहोणे आणि मासे खाणे सुरु केले, आणि त्या बरोबर टाकी मधल्या माशां मधे हालचाल सुरु झाली, ते इकडून तिकडे पोहायला लागले, आणि खूप अॅक्टिव्ह झाले. बेबी शार्क ने काही मासे जरी खाल्ले तरी पण समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यावर जे मासे होते बोटी मधे शिल्लक होते ते एकदम अॅक्टीव्ह , अगदी ’फुल ऑफ लाइफ” होते, आणि ते अगदी त्या पंचतारांकित हॉटेल ला हव्या असलेल्या क्वॉलिटी चे होते. कोळ्याला पण खूप चांगला भाव मिळाल्या त्याच्या माशांना. झालं संपली गोष्ट! मॉरल ऑफ द स्टॊरी :- एक शार्क त्या पाण्याच्या टाकीत सोडल्याबरोबर सगळे मासे अॅक्टिव्ह झाले आजकालच्या कार्पोरेट लाइफ मधे पण असंच सुरु असतं नाही का? . कुठलीही कंपनी घ्या, शार्क च्या जागी “एच आर”, आणि माशांच्या जागी इतर एम्प्लॉइ कन्सिडर करा- आणि हो, तो शेफ म्हणजे मॅनेजमेंट बरं का. आणि पुन्हा एकदा वर लिहिलेली कथा वाचून काढा-

कोल्हापूर.... कार्यकर्त्यांची जडणघडण करणारी तालीम


गल्लीत एक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आहेत. अजूनही खादीचे कपडे वापरून आपली राष्ट्रभक्ती व्यक्त करतात. गल्लीत एक वायुसेनेतील निवृत्त अधिकारीही आहेत... वास्तविक गल्लीतल्या गणेशोत्सवात या दोघांना आरतीचा मान देणे आपले कर्तव्यच आहे; पण तसे नाही, गणेशोत्सवाच्या आरतीचे नियमच ठरले आहेत. ज्याने वर्गणीसाठी पाच हजार रुपयांची पावती फाडली, त्यालाच आरतीचा मान आहे आणि अर्थातच हा मान एक जुगारअड्डा चालक, एक मटकेवाला, एक खासगी सावकार, एक जागेचा दलाल यांना मिळाला आहे. कारण प्रत्येक मंडळाला पाच हजार रुपये वर्गणी देण्याची ऐपत फक्त त्यांच्यातच आहे. गणेशोत्सवाची आरती हे केवळ एक उदाहरण आहे; पण कोल्हापुरातील बहुतेक सार्वजनिक मंडळे, तालमींना सध्या या दोन नंबरवाल्यांच्या पैशाची ताकद मिळाली आहे आणि अशी आर्थिक ताकद वापरून त्यांनी इथल्या सार्वजनिक क्षेत्रात आपले पाय रोवले आहेत. पाचगावच्या घटनेनंतर सीपीआर परिसरात झालेल्या गर्दीवर एक नजर टाकली तर त्यात पाचगावचे अशोक पाटीलप्रेमी ग्रामस्थ जरूर होते; पण ते सोडून अनेक जण मर्डर, हाफ मर्डर, दंगल, दहशत, मटका, सावकारी क्षेत्रातले होते. ते तेथे का आले होते, हे महत्त्वाचे आहे आणि पोलिसांच्या कॅमेऱ्यात त्याचे चित्रीकरणही झाले आहे. या लोकांनी आपले समर्थक गावागावांत, मंडळामंडळांत, तालमीतालमींत कसे पेरले आहेत, हेच त्यातून स्पष्ट झाले आहे. स्वाभिमानाची भाषा वारंवार वापरणाऱ्या कोल्हापुरातले हे चित्र निश्चितच गंभीर आहे. पुढची महापालिका, विधानसभा निवडणूक कोणत्या पातळीवर जाऊन पोचलेली असेल, त्याची एक झलकच त्यातून दिसून गेली आहे. कोल्हापुरात मान कार्यकर्त्याला की गुंडाला, याचा एकदा सर्व पातळीवर विचार करण्याची गरज त्यातून अधिक गडद झाली आहे. कोल्हापूर ही कार्यकर्त्यांची जडणघडण करणारी तालीम मानली जाते. तशी परिस्थितीही आहे; पण कार्यकर्त्यांपेक्षा वरचढ ठरलेल्या काळेधंदेवाल्यांनी कळत नकळत सार्वजनिक कार्यक्रमांचा ताबा आपल्याकडे घेतला आहे. गणपतीची आरती मटकेवाला, महाप्रसाद वाटप दारूवाला, मोहरमचा नारळ फोडायला खासगी सावकार, नवरात्राची पूजा करायला जुगारवाला हे काही मंडळांचे निकषच ठरले आहेत. ते हजाराच्या पटीत वर्गणी देतात म्हणून त्यांना हा मान द्यायचा, हे जणू ठरूनच गेले आहे. हे चित्र भविष्यात अधिक विदारक होणार आहे. हजार, दहा हजारांत एखादे मंडळ "गळाला' लागणार असेल, तर ही काळेधंदेवाली मंडळी आपल्या थैल्या उघडून बसणारच आहेत आणि मंडळ, तालीम बाजूला राहू दे; आपला कोल्हापूरचा स्वाभिमानच ते या काळ्या पैशाच्या बळावर भुसभुशीत करणार आहेत. पाचगावच्या घटनेनंतर "सज्जनांचा कैवारी, दुर्जनांचा वैरी' असे फलक त्यामुळेच लागले आहेत. पाचगावची घटना एखाद्याचा निर्घृण खून झाला म्हणून निश्चित वाईट आहे; पण कोल्हापूरच्या काही मंडळांवर, काही तालमींना काळ्या पैशाचे कसे वरदान होते, यावर प्रकाशझोत टाकून गेली आहे.

वाढत असलेली श्रीमंतांची संख्या , मॅाल्समधील वाढती गर्दी ,यच्चयावत सर्व देवस्थानांमध्ये दर्शनासाठी लागणाऱ्या रांगा , बाबा-बुवांच्या प्रवचनांना होत असलेली चेंगरी-चेंगरीयुक्त गर्दी


एका बाजूला देशात वाढत असलेली श्रीमंतांची संख्या , मॅाल्समधील वाढती गर्दी ,यच्चयावत सर्व देवस्थानांमध्ये दर्शनासाठी लागणाऱ्या रांगा , बाबा-बुवांच्या प्रवचनांना होत असलेली चेंगरी-चेंगरीयुक्त गर्दी , धार्मिक संस्थांना शे-दीडशे कोटींची देणगी देण्याचीही तयारी असललेले भक्त आणि वये वाढली तरी आपण काय बोलतो आहोत , काय करतो आहोत , याचे भान नसलेली माणसे. दुसऱ्या बाजूला १५-२० दिवसांतून एकदाच येणारे पिण्याचे पाणी कसे साठवून ठेवावे याची चिंता असलेली माणसे. मुलीच्या हुंड्याची ,मुलाच्या शिक्षणाची तजविज कशी करावी या काळजीने रात्र रात्र जागणारी माणसे. आणि या दोन्ही वर्गांना कह्यात घेऊन प्रत्येक गोष्टीचे रूपांतर मनोरंजनात करून सादर करणारा टीव्ही! या देशात नेमके काय चालले आहे ? तोल गेलेल्यांचा देश , अशी आपल्या देशाची अवस्था झाली आहे का ? आर्थिक क्रांतीच्या झाडांना लागलेली फळे पदरात पडल्याने , काय करू आणि कशावर खर्च करू असा पैसे खर्च करण्याचा ' भस्म्या ' रोग झालेला एक मोठा वर्ग आहे. तो आपल्या आजबाजूचे सगळे जग केवळ पैशातच तोलत असतो. त्यांच्या मते खर्च करणे आणि मनोरंजन करून घेणे हेच जगण्याचे उद्दिष्ट. असा वर्ग मोठ्या प्रमाणात राजकारणापासून तेउद्योगापर्यंत , कॉर्पोरेटक्षेत्रापासून ते पंचतारांकित सामाजिक संस्थांपर्यंत सर्वत्र आहे. या वर्गाला आपापल्या जातींचे मेळावे भरवून त्यात मिरवून घेण्याची हौस असते. तुलनेने आर्थिक सबलता नसलेली माणसेही अशा मेळाव्यांना जमतात आणि पैसेवाल्या ,सत्तावाल्या जातभाईंची जमेल तशी ' जी हुजुरी ' करतात. सामाजिक मूल्यऱ्हासाच्या अशा काळात आजवर सामाजिक तोल साधण्याचे काम मध्यमवर्ग करत होता. या वर्गाचे उच्चमध्यम वर्गात झापाट्याने झालेले स्थलांतर हे एकूणच समाजाच्या वैचारिक ऱ्हासाचे कारण झालेले आहे असे दिसते. याचे कारण पेहराव आजचा , जीवनशैली आजची आणि वैचारिक पगडा मात्र १८व्या शतकातला असा हा वर्ग आहे. १०व्या-१२व्या ग्रहाचा शोध लागल्याची बातमी इंग्रजी वृत्तपत्र हाती धरून वाचायची आणि घरात मात्र नवग्रहाची पूजाआयोजित करायची अशी ही वृत्ती. त्यातूनच तोल गेलेल्यांची सद्दी या देशात येऊ पाहते आहे. आधी बोलायचे आणि मग आपल्या वक्तव्याचे चुकीचे अर्थ काढले असे सांगत फिरायचे ही यांची यु्क्ती किंवा क्लृप्ती. १५-२० हजार भक्त ज्यांचे मौलिक बोल ऐकायला सहज गोळा होतात ,त्या आसाराम बापूंनी आपण त्यांना कोपरापासून हात जोडावेत असे वक्तव्य करावे ,हिमाचल प्रदेशात सरकार स्थापन करणाऱ्या काँग्रेसच्या आमदाराला एका मुलीच्या हत्येप्रकरणी अटक व्हावी आणि अकबरूद्दीन ओवायसीसारख्या नेत्याने गरळ ओकून सामाजिक शांततेवर रॅाकेल ओतण्याचे धंदे करावेत ही सगळी लक्षणे तोल गेल्याचीच आहेत. या प्रकारे स्वतःच्या स्वार्थासाठी सामाजिक सलोखा नष्ट करणारी , वैचारिक मागासलेपणाला प्रतिष्ठा मिळवून देऊ पाहणारी माणसे ही शेखचिल्लीसारखी असतात. आपण ज्या समाजात , देशात राहतो त्याच समाजाच्या मुळावर आघात करून ती त्यांच्या नाशाला कारणीभूत ठरू पाहत असतात. विवाह , सहजीवन आणि पती-पत्नीचे नातेसंबंध यांची व्याख्या नव्याने करण्याचा प्रयत्न तरुण पिढी करीत आहे. ओवायसी यांच्यासारखे नेतेही धार्मिक तेढ वाढवून , त्या आगीच्या धगीवर आपले कोंबडे भाजू पाहात आहेत. जातींचा , धर्माचा अभिमान मनात राहणे हे अज्ञानी , अडाणीपणाचे लक्षण आहे. दुर्दैवाने बहुसंख्य लोक अद्याप या अर्थाने अडाणीच आहेत. आपले अज्ञान ते झाकून ठेवतात. या झाकलेल्या अज्ञानाला जागे करण्याचे कामच धार्मिक नेते करीत आहेत. आसाराम बापूंसारखे ' साधू ' म्हणवून घेणारे आध्यात्मिक धनदांडगेही त्याच वैचारिक पठडीतले आहेत. मोह , माया , क्रोध यांच्यापासून दूर राहण्याचा उपदेश करणारी ही मंडळी स्वतःच्या आश्रमांचे उत्पन्न मात्र करोडोने वाढवित असतात. गेले काही दिवस होत असलेली जाहीर वक्तव्ये पाहता , सामान्य माणसाला स्वतःलाच आता आपला तोल सांभाळावा लागेल , असे दिसते.

लग्न का करतात?


लेखाचे हे हेडिंग वाचल्यावर तुमच्या पैकी जवळपास ९० टक्के लोकांच्या मनात हे काही उत्तर आले असेल ते उत्तर मला अभिप्रेत नाही. लोकं लग्न का करतात? तसं म्हंटलं तर याचं उत्तर प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे असणे अपेक्षित आहे. पण बहुतेक लोकांचं उत्तर एकच असावं असं वाटतं- पण खरंच तसं असतं का? जेंव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी आपलं शिक्षण पुर्ण करतो आणि नोकरीला लागतो, तेंव्हा साधारण २३-२४ वय असतं. हातात मस्त पैकी पैसा खुळखुळत असतो. कॉलेज मधे शिकत असतांना बाबांच्या कडून मिळणारा लिमिटेड पॉकेट मनी आता एकदम मल्टीफोल्ड मधे वाढलेला असतो. नवीन मित्र मैत्रिणी झालेल्या असतात. मस्त पैकी सिनेमे, नाटकं, ट्रेकिंग वगैरे सुरु असतं. आठवडाभर काम करायचं आणि विकएंडला मस्ती करायची… असा प्रोग्राम सुरु असतो. सुरुवातीला काही दिवस तरी घरचे लोकं काही म्हणत नाहीत, पण लवकरच, म्हणजे एक दोन वर्ष झाली की मग जर मुलगी असेल तर आई वडिलांना तिच्या लग्नाची काळजी वाटायला लागते. किती दिवस उंडारू द्यायचं हिला असं? आता लवकर उजवून टाकायला हवं!घरच्या लोकांची सारखी भूणभूण सुरु होते. मुलींना मात्र अजून काही दिवस तरी एकटं रहायची इच्छा असते. स्वातंत्र्य इतक्या लवकर संपावं अशी इच्छा नसते. पण……… आई वडिलांच्या इच्छे पुढे काही फारसं चालत नाही आणि चहा पोहे सुरु होण्याची लक्षणं दिसू लागतात. मुलाच्या बाबतीत थोडं वेगळं सुरु होतं. आता २५ चा झाला, म्हणजे अजून दोन तीन वर्ष तरी लग्नाला वेळ आहेच. पण घरचे लोकं मानसिक तयारी व्हावी म्हणून येता जाता टोकत असतात. एखादी चांगली दिसणारी मैत्रीण वगैरे असेल तर ,” काय रे तसं काही आहे का तुझं? असेल तर सांग, आम्ही भेटतो तिच्या आई बाबांना” असं आई बाबा म्हणाले की मग मात्र ” अरे हो यार.. खरंच आपलं लग्नाचं वय होत आलं की आता” ही चाहूल लागते. इथपर्यंत सगळ्यांचे सारखंच असतं. त्याला पण आपण लग्न का करायचं हे काही लक्षात येत नाही. फक्त इतर मित्रांची- मैत्रिणींची लग्न झाली म्हणून आपणही करायचं का? सोशल अॅक्सेप्टन्स सा्ठी-की कोणी तरी हवी मागच्या सिट वर बसायला म्हणून अजिबात काही समजत नसतं. घरचे लोकं मागे लागले, की आता लग्न करा,म्हणून करायचं? त्याला थोडी भिती वाटत असते, लग्न करायचं म्हणजे आपल्या बरोबर ती पण रहाणार, म्हणजे तिची पण जबाबदारी आलीच.काय करायचं? तिच्याही मनात साधारण असेच विचार येतच असतात, की कसं एखाद्या अनोळखी मुलासोबत रहायला जायचं? अख्ख्या आयुष्यात आई बाबांना सोडून कुणाकडे रहायला गेले नाही, आता हे कसं जमेल आपल्याला? लग्न करायलाच हवं का?? दोघांनाही आपला प्रेम विवाह व्हावा असे वाटत असते. पण हिम्मत दोघांचीही होत नसते.. तिला पण तो बरा वाटत असतो, त्याला पण ती छान दिसायला लागते. मैत्रिणींकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला जातो. अगदी निर्भेळ मैत्री असते ती थोडी पझेसिव्ह व्हायला लागते. ट्रेक ला जातांना बस मधे तिच्याच शेजारी बसायला मिळावं म्हणून धडपड सुरु असते, तिला पण हे सगळं समजत असतं, पण ती मात्र अजिबात काही लक्षात न आल्याप्रमाणे वागत असते. वाट पहात असते, ’हा येडा’ कधी काही बोलतो का ह्याची! पण ” हा येडा” मात्र कुठलाही धोका पत्करायला तयार नसतो. समजा विचारलं, आणि मग ती नाही म्हणाली तर? असे प्रश्न भुंग्या सारखे डोक्यात पोखरत असतात. काय करावं बरं?? विचारावं की नको? बरोबरच्या मित्रांच्या पण लक्षात आलेले असते हे सगळे, पण कोणी तसं बोलून दाखवत नाही. हे दोन्ही प्राणी आपलं मुकत जीवन एंजॉय करत असतात. बरेचदा तिला पण वाटत असतं, की ह्या मुखदुर्बळ माणसाने कधी तरी विचारावे, पण हा मात्र ढीम्म पणे बसलेला असतो- आणि कधीच काही विचारत नाही. असेच काही दिवस जातात. तिचे चहा पोह्यांचे कार्यक्रम सुरु होतात, त्याचं अजून मुली पहाणं सुरु झालेले नसते. मधल्या काळात , एक तर तिचे लग्न ठरते किंवा तिला कोणी पसंत पडलेला नसतो . हे वर जे काही लिहिलंय ते बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतं. लग्न का करायचं? हा कन्सेप्टच क्लिअर नसतो.वर ज्या घटना लिहिल्या आहेत, त्या सर्वसाधारण पणे मुलांच्या जीवनात घडणाऱ्या घटना असतात. या सगळ्या काळात एकदाही लग्नाचा विचार मनात आलेला नसतो, पण नकळत सामाजिक जाणीव लग्नाच्या दिशेने मन तयार करत असतं. **** लग्नाचं पहिलं कारण म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला अगदी मनापासून आवडत असते. एक मैत्रीण म्हणून किंवा मित्र म्हणून. ती ्दुसरया कोणाशी तरी लग्न करून ,आपल्या पासून दूर जाणार ही कल्पनाच सहन होत नाही, आणि मग नेहेमी साठी तिच्या बरोबर रहायला हवं ना? म्हणून मग लग्न केले जाते.. ! दुसरा कन्सेप्ट म्हणजे , दोघंही सगळीकडे आपल्या स्वप्नातला राजकुमार किंवा राजकन्या पाहून दमलेले असतात. मग दोघंही एकमेकाला कॉम्प्लिमेंट करायला म्हणून एकदम साक्षात्कार झाल्या प्रमाणे ” अरे आपल्याला तर हीच आवडत होती?” असे लक्षात आल्याने लग्न करतात. काही लोकं असेही म्हणतात की मुली फायनान्शिअल सिक्युरीटी साठी लग्न करतात. पण तसे नाही. कारण आज मुली पण मुलांच्या इतक्याच शिकलेल्या असतात, आणि मुलांच्या बरोबरीने पैसे कमवायची धमक बाळगून असतात, तेंव्हा हे फायनान्शिअल सिक्युरिटी चे कारण मला तरी पटत नाही. अहो जर हेच कारण असते, तर ऐश्वर्या रायला लग्न करायची काही गरज होती का?? तिच्याकडे करोडो रुपये आहेत, कशाचीच कमतरता नाही .. पण तिलाही लग्न करावंसं वाटलंच ना? पण याच गोष्टीवरून एक लक्षात येतं की फायनान्शिअल सिक्युरीटी जरी असली, तरीही समाजातलं अॅक्सेप्टन्स मिळायला हवं म्हणून तिने लग्न केले असेल का? ति्चे एकटी असतांना लग्नापूर्वीचे स्टेटस आणि आजचे स्टेटस या मधे पडलेला फरक पहाता हा मुद्दा पटतो. काही मुली कार्पोरेट वर्ल्ड मधे चांगले पैसे कमावत असतात, बरोबरचे सगळे लग्नाळू मुलं मागे लागलेले असतात, पण नंतर काही दिवस यांच्याकडे दुर्लक्ष केल्यावर , आणि बहूतेक दुसरी एखादी मुलगी आल्यावर पली एक हॉट गर्ल ची इमेज जेंव्हा थोडीविस्कळीत व्हायला लागते, तेंव्हा आपल्यापे क्षा जास्त पैसे मिळवणारा मुलगा बघून लग्न ठरवले जाते. बरेचदा नोकरी निमित्य एकटे रहावे लागते, मग त्या एकटेपणातुन बाहेर पडण्यासाठी , निःस्वार्थी प्रेम , की जे आजपर्यंत केवळ आई , वडील, भावंडं यांच्या कडूनच मिळालेलं असतं, ते शोधण्याचा प्रयत्न सुरु केला जातो,आणि मग ते न मिळाल्यास, वैफल्य आणि सरळ मुलगा बघून लग्न करण्याचे ठरवले जाते. अगदी हीच गोष्ट मुलांच्या बाबतीतही घडते. अजून एक कारण म्हणजे आई वडलांच्या बंधनात रहाण्याचा कंटाळा आलेला असतो, आणि मग त्या बंधनातून सुटण्याचा मार्ग म्हणून लग्न करणारे पण काही लोकं असतात. दोघांचेही एकच करिअर असतं (डॉक्टर, इंजिनिअर, नाटक वगैरे), आवड पण जुळते, जसे नाटक, सिनेमा, संगीत, वगैरे आणि मग असं वाटायला लागतं की आपण बरोबर रहायला हरकत नाही, म्हणून मग लग्न!!! धार्मिक बंधनं, म्हणून – म्हणजे धर्मात सांगितले आहे की लग्न रिप्रोडक्शन साठी करा म्हणूनही लग्न करणारे लोकं आहेत. या सगळ्या गोष्टी शिवाय एक गोष्ट म्हणजे जीमी पहिल्या पॅरीग्राफ मधे तुमच्या मनात पहिले आली होती ती – म्हणजे शारिरिक गरजा ! हवं तर बायोलॉजिकल निड्स म्हणता येईल त्याला. सेक्स हा पण उद्देश आहेच. पण केवळ सेक्स साठी म्हणून लग्न केले जात नाही, तर सेक्स हा एक लग्न केल्यावर होणारा अनुषंगाने येणारा भाग आहे. सेक्स साठी म्हणून कोणी लग्न करत नाही. जसे सिनेमाचे हिरो हिरोईन्स, काही देशांचे प्रेसिडेंट्स, ब्रिटनचा राजकुमार, विजय मल्या, वगैरे की ज्यांनी मनात आणले आणि त्यांनी फक्त हो जरी म्हंटले, तरीही त्यांची सोबत करण्यास बऱ्याच स्त्रिया तयार होतील. त्यांना तर आयुष्यात लग्न करायची गरज पडायला नको. पण केवळ सेक्स हा एकच मुद्दा लग्ना करण्यामागे कधीच नसतो. एक कमिटेड रिलेशनशिप, होणाऱ्या बाळाला वडिलांचे नांव, हे मुद्दे पण आपल्या कडे फारसे महत्त्वाचे वाटत नाहीत. कारण विवाहपूर्व संबंध अजून तरी सर्वमान्य झालेले नाहीत. जेंव्हा कोणाचं लग्न होतं, तेंव्हा तो कोणाचा तरी कोणी तरी होतो. म्हणजे बघा, ऐश्वर्या राय बच्चन ही अभिषेकची बायको , अमिताभची सून, त्या बाळाची आई.. इतके काही झाली लग्नानंतर. हा जो सामाजिक रिस्पेक्ट मिळतो तो मिळवण्याची प्रत्येकाचीच धडपड असते -आणि म्हणून लग्न केले जाते. सगळ्यात शेवटी एकच सांगतो, लग्न का करतात लोकं?? यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे बस्स्स!! करायचं म्हणून करतात . जर तुमचे लग्न झालेले असेल तर आपण लग्न का केलं? हे आठवुन बघा, आणि जर लग्न झालेले नसेल तर आपण लग्न का करणार आहोत याचा विचार करून पहा…. जर काही वेगळं सुचलं तर इथे कॉमेंट लिहा…

इस्माईल प्लिज


“साब, हसो .. छे बार हो गया, आप बराबर नई हसता है, मेडम देखो कैसे मस्त हसती है , आप हसो ना, टेन्शन नय लेनेका” त्याने ऑर्डर सोडली. आमच्या लग्नाचा विसावा (की तेविसाव्या? जाऊ द्या, काय फरक पडतो?) वाढदिवस असावा, आम्ही सगळे म्हणजे मी, सौ, आणि मुली फोटॊ स्टूडीओ मधे फोटॊ काढायला गेलो होतो. फोटोग्राफर इतका फास्ट होता, की इस्माईल प्लिज, म्हणायचा आणि दुसऱ्याच क्षणी क्लिक करायचा. त्याने इस्माईल प्लिज म्हटल्याबरोबर बायको आणि मुलींच्या चेहेऱ्यावर एकदम हुकुमी हास्य यायचं, पण मला काही हसणे जमत नव्हते. मी त्याला म्हणत होतो, की अरे बाबा, इस्माइ बोलने के बाद मुझे थोडा टैम तो दो हसनेके लिये.. पण चार पाच वेळ फोटो काढल्यावर पण त्याला काही माझं’ इस्माईल कॅप्चर करता आलं नाही.. हसू येणे हे असेच असते, जेंव्हा यायचं असेल तेंव्हा तुमच्या नकळत येते, अगदी विनाकारण पण येते , आणि नसेल यायचे तर, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही येत नाही . एखाद्या वेळेस तुम्ही तुमच्या बॉस समोर बसले असता, तेंव्हा अचानक एखादा जुनी घटना आठवते, आणि नकळत हसू फुटतं . बॉस काहीतरी कामाचं खूप महत्त्वाचं सांगत असतो, आणि तेंव्हा तुमच्या चेहेऱ्यावर हसू पाहिलं, की त्याची जाम चिडचिड होते, ’व्हाट्स फनी? लेट मी नो, आय विल आल्सो लाफ” हा डायलॉग प्रत्येकानेच आयुष्यात कधी ना कधी तरी ऐकला असतो. जेंव्हा हसू येतं तेंव्हा अगदी धबधब्यासारखं खो खो करत येतं, कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरीही ओठावरचे हसू काही थांबत नाही. ओठ बंद केल्यावर, तुमचे सगळे शरीर गदा गदा हलत हसत असते. त्यातल्या त्यात डोळे तर खूप मिश्किल असतात, एकदा हसायला लागले, की ओठ बंद केल्यावर पण हसत असतात, हसणारे डोळे इतके काही सांगून जातात की ज्या साठी लाखो शब्दंही पुरेसे पडणार नाहीत. हसणारे डोळे म्हणजे? आठवा, तुमचे लग्न झाल्यावर तुम्ही आजीला जेंव्हा पहिला नमस्कार करायला जाता तेंव्हाचे तिच्या डोळ्यातले हसू, किंवा जेंव्हा तुम्ही एखादी परीक्षा पास होता, कॅंपस मधे सिलेक्ट होता , तेंव्हा तुमच्या आईवडिलांच्या डॊळ्यात उमटलेले हसू आठवून पहा त्या डोळ्यांमध्ये हसू असतं, आणि सोबतच गर्व पण असतो – आपल्या मुला, मुली बद्दलचा! हे सगळं आठवा मग मी काय म्हणतोय ते लक्षात येइल. ’अमेरिकाज फनिएस्ट व्हिडीओ” नावाचा एक कार्यक्रम सौ. खूप आवडीने पहाते. त्या मधे ’फन” म्हणजे काय असतं? तर धडपडणे. सारखे कोणीतरी काही तरी करतांना पडत असतात, आणि त्याचे लहान लहान व्हिडीओ असतात. बरेचदा अगदी तीन चार वर्षाचं मुल सायकल वरून अगदी उलटसुलट पडतं आणि त्या मागे रेकॉर्डेड हसू ऐकवतात, आणि हा असा व्हिडिओ फनी व्हिडीओ म्हणून पोस्ट केलेला असतो. मला स्वतःला ते व्हिडीओ पाहून अजिबात हसू येत नाही, तर मनात ” अरेरे.. किती लागलं असेल बिचाऱ्याला हा विचार येतो. कोणी कशावर हसायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याच कार्यक्रमात , लग्नाच्या व्हिडीओ मधे नवऱ्या बायकोने एकमेकांना केक (ने) भरवणे ( शब्दशः अर्थ घ्या, चेहेऱ्यावर केक ने लेप देणे ) व्हिडीओ पण नेहेमीच दाखवतात. त्याच्या लग्नात केक हा केवळ नवरा नवरी ने एकमेकांच्या चेहेऱ्यावर माखण्य़ा साठी बनवतात का? हा प्रश्न नेहेमी पडतो मला. मानवी स्वभाव आहे झालं, हसू येतं ते दुसऱ्याच्या फजितीवर. जर समजा राहूल गांधी किंवा सोनिया गांधी केळाच्या साला वरून घसरून पडले, तर त्यांना कोणी हसणार नाही, तर खरंच काही लागलं का म्हणून काळजी करतील. या जगाचा हा नियमच आहे, कमकुवत माणसाला हसा, त्याची टिंगल टवाळी करा.. कारण बिचारा करून करून करेल तरी काय? पडला तर धडपडत उठेल, केविलवाणा हसेल आणि दुःखाच्या कळा मनातल्या मनात जिरवत लाजे खातर तुमच्या नजरा चुकवत समोरून निघून जाईल. पण हसू हे असंच असतं, जेंव्हा येतं तेंव्हा येतच असतंम- कमकुवत माणसाची फजिती पाहून तर जास्त येतं. हे हसू येणं पण मोठं विचित्र असतं, बरेचदा एखाद्याने काही सांगणे सुरु केले की ओठाच्या कोपऱ्यातून अपमानकारक ( कंटेम्प्ट) हास्य पण बरेचदा दिसते.त्याचा अर्थ असतो , मला माहिती आहे , की तू मूर्ख आहेस! पण यातली गम्मत अशी की, समोरच्या माणसाला ते लक्षात येत नाही, आणि तो आपण सांगितलेल्या गोष्टीवर दुसरा माणूस हसला म्हणून खूश होतो. कधी हसावे आणि कधी नाही , याला पण काही नियम नाहीत, पण तरीही समजा असते, तर ते कसे असते याची उदाहरणं समोर देतोय. जसे तुमच्या हातात सोलले संत्रे आणि समोरच्या माणसाच्या हातात ” संत्र्याची साल “असेल तेंव्हा हसू नये, कटींग करायला बसले आहात, न्हावी कानामागचे केस वस्तऱ्याने साफ करतोय तेंव्हा , बॉस ची काही चूक झाली असेल तेंव्हा, तुमच्या कडे सुटे पैसे नसताना कंडक्टर कडे पाहून, शाळेत सर शिकवत असतांना सरांच्या शर्टची बटन्स खाली वर लागलेली असताना, गर्ल फ्रेंड सोबत असेल, तुम्ही पिझा खायला गेला आहात, आणि तिच्या ओठाच्या दोन्ही कोपऱ्यात चिझ /केचप लागलेले असते तेंव्हा, तिला कधी शिंक आली, आणि तिने रुमालाने नाक पुसण्या आधी तुम्हाला तिचे नाक दिसले तरीही ते पाहून कधीच हसू नये.अशी अनेक उदाहरणे देता येतील, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ” बायकोचे चुकले असतांना, आणि तुम्ही तिची चूक पकडली असतांना तर अजिबात हसू नये!” चक्रधरांच्या एका कविते मधे त्यांनी असे लिहिले आहे .. ये हसीं एक चमत्कार है, चेहेरे के भूगोल मे होठोंके विभिन्न कोणीय प्रसार है! पिताजी हसें तो फटकार है, मां हसे तो प्यार है, बिबी हसे तो पुरस्कार है, पती हसे तो बेकार है, उधार देने वाला हसे तो इन्कार है, लेने वाला हसे तो उसकी हार है, दुश्मन हसें तो कटार है पागल हसे तो विकार है, व्हिलन हसे तो हाहाकार है, पडोसी हसे तो प्रहार है, दुकानदार हसे तो भार है, हिरो हसे तो झंकार है, हिरोइन हसे तो बहार है, प्रेमिका हसे तो इजहार है, प्रेमी हसे तो फुहार है, ओ हसिं, “तू धन्य है! तुझे धिक्कार है’ क्योंकी जहा नहीं आनी चाहिये वहा आनेमे देर नहीं लगाती है, एक पल मे महाभारत कराती है! या जगात हसणं सगळ्यात महत्त्वाचे आहे, तुम्ही हसायला लागला की ते संसर्गजन्य असल्याने तुमच्या संपर्कात येणारे सगळे हसू लागतात. स्वतःवर केलेले हास्य हे नेहेमीच सगळ्यांना हसवते. असं म्हणतात की मानवाला हसू येतं, आणि जनावराला नाही. एवढाच काय तो दोघांमधे फरक आहे. म्हणजे च याचा अर्थ हा की, जो हसत नाही तो जनावरासारखाच आहे. कोणाचं हसू कशात, तर कोणाचं कशात! नेत्यांचे हासू असतं ते पैशाच्या खोक्यात, बाळाचे हसू , आईच्या ओठात, विद्यार्थ्याचे हसू, केटी न लागल्याच्या रिझल्ट मधे, बायकोचे हसु नवऱ्याच्या पाकिटात, नवऱ्याचे हसू बायकोच्या हसण्यात! आणि हो मंत्र्यांचे हसू, केजरीवालच्या हातात! (चक्रधर यांच्या कवितेवर.)

केंव्हातरी याची उत्तरे देईन


एकदा संत एकनाथांना एकाने दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबध्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबध्दल. एकनाथ हसले; आणि, 'केंव्हातरी याची उत्तरे देईन', म्हणून त्यांनी सांगीतले. काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, " तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस." तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला. जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली. ती त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, "तुमच्या कृपेने वाचलो." एकनाथ मान डोलवित म्हणाले, "आता मी तुम्हाला दुस-या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?" तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, "कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुस-यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायका-मुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजा-याचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले." एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले, "हे तुझ्या दुस-या प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदाच वावरतो. म्हणून मी शांत वाटतो”

. पैसा, प्रसिद्धी, नोकरी, यश, कीर्ती, प्रेम- काय हवं असेल बरं स्त्रियांना??


खरंच.इतका गहन प्रश्न आहे की या विषयावर बरीच पुस्तके प्रकाशित झालीत, बऱ्याच मोठ्या मोठ्या प्रथितयश लोकांनी पुस्तकं लिहिली आहेत या विषयावर. पैसा, प्रसिद्धी, नोकरी, यश, कीर्ती, प्रेम- काय हवं असेल बरं स्त्रियांना?? असं म्हणतात की स्त्रियांना काय हवं आहे हे शोधायला मार्कंडेय ऋषींचं आयुष्य पण पुरणार नाही.तरी पण ह्या लहानशा आयुष्यात शोधायचा केलेला प्रयत्न! संध्याकाळी आम्ही सगळे म्हणजे सौ, मी आणि धाकटी मुलगी मार्केटला गेलो होतो. मोठी मुलगी तर टाळते आजकाल आमच्या बरोबर ( म्हणजे आई बाबांबरोबर) बाहेर यायला. म्हणते आम्ही आता लहान राहिलो नाही, तुमच्या बरोबर, किराणा किंवा भाजी आणायला. हीच गोष्ट पूर्वी दोघींना पण खूप आवडायची. किराणा खरेदी म्हणजे तर सगळ्यात आवडतं काम. डी मार्ट च्या दुकानात गेल्यावर इकडे तिकडे धावा धाव,किंवा तार स्वरात किंचाळून विचारणे.. आई… आपल्याला मटर पनीर घ्यायचं आहे कां रात्री साठी? किंवा केलॉग्ज कुठला फ्लेवर घेऊ गं? जर दोघींना पण डिसीजन पॉवर दिली असती , की तुम्ही तुमच्या आवडीचा फ्लेवर घ्या, तर मला खात्री आहे दररोज आम्हाला केलॉग्ज चोकोज, खावे लागले असते आणि जेवणात मटर पनिर ची भाजी चॉकलेट म्हणजे जीव की प्राण आहे मुलींचे..”ग्रूव्ह” सुरु झालं, गोरेगावला. आम्ही एकदा तिकडे गेलो होतो. त्या दिवसात एक नवीन कन्सेप्ट आला होता. “हरेक माल दस रुपये” च्या धरतीवर -डॉलर शॉप, म्हणजे हरेक माल ४९ या ९९ हे दुकान सुरु झालं होतं. त्या दुकानात प्रिंगल्स वेफर्स आणि त्रिकोणी चॉकलेट टॉब्लेरॉन मिळणे सुरु झाले होते.पूर्वी आठवतं ही चॉकलेट्स फक्त कोणि अमेरिकेहुन किंवा इंग्लंड हुन येणार असेल तरच मिळायची .पण आता भारतामधे सगळंच मिळतं. तर ह्या दुकानात गेलो की कमित कमी ३००-४०० रुपये खर्च व्हायचे .या दुकानात जायला तर मुली कधिही तयार. मी तर शक्यतो टाळतोच हे दुकान.पण हल्ली ह्या दुकानात जायचं म्हंटलं तरिही मुली नाहीच म्हणतात. मुलींच्या आवडीनिवडीतला हा बदल, तर सुरुवातीला पचवणे जरा जडच गेले. अहो, ज्या मुली तुमच्यावर संपुर्ण अवलंबून हो त्या, त्या आकस्मित पणे स्वतःचे व्यक्तित्व वेगळे मेंटेन करण्याचा प्रयत्न करतांना बघून , कधी बरं वाटायचं… तर कधी एकटे पणा वाटायचा. बरं मुलींनी येत नाही म्हंटलं की मग मला राग येतो. केवळ बाबांना राग येतो म्हणून काही वेळेस त्या दोघीही आमच्या बरोबर येतात. परंतु त्यांची बॉडी लॅंग्वेज इतकी बोअर झाल्यासारखी असते, की मलाच गिल्टी वाटायला लागतं. अजुन ही कुठल्याही दुकानात मी आणि सौ. गेलो तर (मुलींना घरी ठेवून) तर खुप चुकल्या सारखं होतं. धाकटी पण आता मोठीच्या पावलावर पाउल टाकुन बरोबर यायला नाही म्हणते. एखाद्या मैत्रिणीने बघितले आई बाबांसोबत फिरतांना तर मग कित्ती प्रॉब्लेम नं??असं जेंव्हा ती म्हणाली तेंव्हा आमच्या लक्षात आलं, की त्या दोघी मोठ्या झाल्या आहेत ’ऍंड नाउ दे निड देअर ओन स्पेस…ऍंड इफ, ऍट धिस जंक्चर वी मस्ट अलाउ देम टु डेव्हलप देअर ओन पर्सनॅलिटी, वी मस्ट अलाउ देम टू टेक देअर ओन डिसिजन्स टू सम एक्स्टेंट..ऍट लिस्ट इन सच स्मॉल मॅटर्स.. लुज द ऑर एल्स दे मे लुज द सेल्फ एस्टिम .… हा सृष्टीचा नियम आहे. मुलं तरुण होणार – आपण म्हातारे होणार! आता, जाणवतंय की , सौ. ला चांगली हूशार आणि शिकलेली असतांना पण मुली लहान आहेत, आणि मला टूरला जावं लागतं, म्हणून मी नोकरी करू दिली नाही. मुली मोठ्या झाल्यावर फार एकटेपणा वाटतो, ह्या सबबीवर वयाच्या ४२ वर्षानंतर तिने घराबाहेर जाउन नोकरी सुरूकेली. केवळ माझी इच्छा म्हणून, मुलींकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून, तिने सगळं मान्य पण केलं.स्त्रियांना तसंही आयुष्यात बरंच कॉम्प्रोमाइझ करावं लागतं. मला असं वाटतं प्रत्येक घरामधे निर्णय पुरुषच घेतात. बरेचसे निर्णय एककल्ली पण असतात, परंतु निर्णय घेतांना स्त्रियांना पण तुम्हाला विचारुन सगळं काही करतोय , असं भासवण्याचा पुरुष वाकबगार असतात. वरचा हसरा स्माइली बघून , तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला हसू येइल, आणि तुम्ही स्त्री असाल तर राग येइल.. खरं की नाही??पण हीच परिस्थिती थोड्या फार फरकाने सगळी कडे आहे. बरं शेवटी पुन्हा एकदा मोठ्ठा प्रश्न!. …..सगळ्यात मोठा प्रश्न.. स्त्रियांना काय हवं असतं? इव्हन १३-१४ वर्षाची मुलगी सुद्धा स्वतःच्या जीवनावर ,स्वतःच्या निर्णयावर ताबा असावा, अशी अपेक्षा करते.. आणि म्हणून मला असं वाटतं की हेच खरं उत्तर आहे ह्या प्रश्नाचं…. स्त्रियांना फक्त एक गोष्ट हवी असते ती म्हणजे स्वातंत्र्य! “स्वतःच्या जीवनावर स्वतःचा ताबा” & “स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची इच्छा शक्ती!” हो इच्छा शक्ती ह्या साठी म्हणतोय की सध्या ती इच्छा शक्ती अजिबात शिल्लक राहिलेली नाही . . काहीही निर्णय घ्यायचा असेल तर, थांबा हं!! ह्यांना विचारुन सांगते .. मग ती ऑफिस ची पिकनिक असो की एखादी लहानशी गोष्ट विकत घ्यायची असो..! .“स्वतःच्या जीवनावर स्वतःचा ताबा” & “स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची इच्छा शक्ती!”म्हणून म्हणतो ह्या दोन गोष्टीच स्त्रियांना हव्या असतील आजच्या जगात असे मला वाटते.

कंटाळा म्हणजे प्रत्येकालाच नको असलेला पाहुणा!


कंटाळा म्हणजे प्रत्येकालाच नको असलेला पाहुणा! आज सकाळपासून माझ्या कडे ठाण मांडून बसलेला आहे हा न बोलावलेला पाहुणा! काही केल्या दूर होत नाही. टिव्ही वर पण एकही आवडीची सिरियल, सिनेमा नाही ज्यामुळे काही वेळ बरा जाईल. वाचायला पुस्तक उचललं तर त्यातही लक्ष लागत नाही. पेपर सगळे वाचून झाले. फेसबुक वर गेल्यावर दहा मिनिटे बरे वाटले, पण नंतर पुढे काय करायचे हा प्रश्न होताच? हा कंटाळा म्हणजे नेमकं काय? तर बराच वेळेस सगळं जग संथ झालेलं असतं, काहीच घडत नाही, तेंव्हा आपल्याला प्रकर्षाने काही तरी व्हावं असं वाटत असतं, तेंव्हा येतो तो कंटाळा. तसंही आपण करमणुकी साठी काहीही करायला तयार असतो. वाचन, लेखन, सिनेमा, टिव्ही, फिरायला जाणे, मित्रांबरोबर गप्पा मारणे वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्या गोष्टींची पण इतकी सवय होऊन जाते, की प्रत्येक गोष्ट अगदी ठरवल्याप्रमाणे होत असते, आणि मग कंटाळा येतो. थोड्या जड भाषेत, जीवनात स्वतः पासूनच एक प्रकारची अलिप्तता, पोकळी निर्माण झाली की कंटाळा येतो. जे काही तरी व्हायला हवं असतं ते नेमकं काय असतं? अर्थात त्याची काही व्याख्या केली जाऊ शकत नाही. मनाला रिफ्रेश करणारी, उत्तेजित करणारी कुठलीतरी गोष्ट व्हायला हवी असते. खूप चांगलीच गोष्ट असली पाहिजे असे पण नाही, तर एखादी उत्कंठा वाढवणारी लहानशी गोष्टही कंटाळा दूर करू शकते. तसं म्हटलं तर पूर्वीच्या काळा पेक्षा हल्ली बऱ्याच करमणुकीच्या गोष्टी उपलब्ध आहेत. पूर्वीच्या काळी फक्त सण वार, आणि त्यानुसार येणारे प्रासंगिक कार्यक्रम हेच काय ते करमणुकीचे साधन असायचे. त्या मानाने आज इतकी साधनं उपलब्ध असूनही कंटाळा काही आपली पाठ सोडायला तयार नसतो. आठवडाभर काम केल्यावर जेंव्हा एखादा मित्र संध्याकाळी कुठेतरी भेटायचं का असे जेंव्हा पिंग करतो, तेंव्हा दिवसभरातला कंटाळा कुठल्या कुठे पळून जातो, आणि आपण संध्याकाळची वाट पहात उत्साहाने काम करायला लागतो. हा अनुभव प्रत्येकानेच कधी ना कधी तरी घेतला असेलच. किंवा, ऑफिसमधे गेल्यावर बॉस चिडचिड करणार , समोरची ती मुलगी जी तुम्हाला खूप आवडते, जी नेहेमी दुसऱ्या एखाद्या बरोबर लंच ला जात असते, तुम्ही बोलायला गेलात तर , की दुर्लक्ष करणारी – हे सगळं अपेक्षित असतं, आणि म्हणून ऑफिसला गेल्यावर एकदम कंटाळा येतो. पण जस्ट इमॅजिन करा, की तुम्ही सकाळी ऑफिसला गेला, आणि बॉस एकदम चांगला वागतो, तुमच्या कामावर अजिबात काही कॉमेंट करत नाही, ती समोरच्या टेबलवरची तुमच्याकडे पाहून चक्क हसते, आणि पिंग करून तिच्या टेबलवर तिच्या काहीतरी प्रॉब्लेम साठी बोलावते आणि नंतर म्हणते, की दुपारी लंचला सोबतच जाऊ, आणि संध्याकाळच्या नाटकाची दोन तिकिटं आहेत येणार का?????, सगळं काही अनपेक्षित , तुमच्या कल्पनेच्या एकदम विपरीत घडतं, आणि मग कंटाळा अगदी आसपासही फिरकायला तयार नसतो. तुम्ही अगदी पूर्ण उत्साहाने कामाला लागता, लंच टाइम कधी होतो याची वाट पहात. एखादी आवडीची गोष्ट, की जिचा तुम्हाला कधीच कंटाळा येऊ शकत नाही असे वाटत असते, ती सुद्धा सारखी करत राहिल्यास तोच तो पणा येऊन कंटाळा येतो. लग्नापूर्वी बायको गर्ल फ्रेंड असतांना तुम्ही तिच्याबरोबर फोन वर तास अन तास बोलू शकता, पण लग्न झाल्यावर काही दिवसातच काय बोलायचं हा प्रश्न पडतो. कारण एकच, तुम्हाला सहजसाध्य असलेली गोष्ट कंटाळा आणू शकते- मग ती खाण्याची, वाचन, टिव्ही, सिनेमा, भटकंती – अगदी काहीही असो. जीवन एकसुरी व्हायला लागले, की कंटाळा येतो. मला तर नेहेमी वाटतं, की आयुष्यात काहीतरी एन्झायटी असायला हवी. कंटाळ्याचे अजून एक कारण म्हणजे , एखाद्या गोष्टी बद्दलची आपली कल्पना ही काही तरी वेगळीच असते, पण प्रत्यक्षात जेंव्हा ती गोष्ट अनुभवतो, तेंव्हा किंवा तिच्याबद्दल पुर्ण पणे माहिती झाल्यावर , आपल्या मनातली “प्रतिमा” आणि “वास्तव” या मधला फरक दिसला की मग त्या गोष्टीचा कंटाळा येऊ शकतो. एखादी गोष्ट न आवडणं म्हणजे कंटाळा नाही.कंटाळा म्हणजे अनुत्साह वाटणे. कुठलेतरी थ्रिल अनुभवायला मिळावे असे वाटणे . कंटाळ्या पासून दूर पळणे हा माणसाचा स्वभाव आहे. आपण नेहेमीच अशा थ्रिल च्या शोधात असतो, म्हणूनच तर एस्सेल वर्ल्ड मधल्या जिवघेण्या राईड्स मधे पण मनातून भीती वाटत असतांना पण आपण जीव मुठीत धरुन बसतो, आणि तो क्षण जपून ठेवायचा प्रयत्न करत असतो. कार रेस, क्रिकेट, मोटरसायकल ड्रायव्हिंग, ट्रेकिंग हे असेच खेळ. पण फक्त ट्रेकिंगच शारीरिक थकवा आणून ताजेतवाने करु शकते. काहीतरी चित्तथरारक अनुभवायला मिळावे ही आपली खास मनापासून इच्छा असते. एखाद्या गोष्टीचे व्यसन असलेल्या माणसाला ती गोष्ट ठरावीक वेळेस नाही मिळाली तर कंटाळा होतो, बेचैनी वाढते. जर तुमचा एखादा मित्र तंबाखू किंवा सिगरेट ओढणारा असेल, तर तुम्ही त्याला बरेचदा सिगरेट साठी कासावीस होतांना पाहिले असेल. व्यसना मुळे येणारा कंटाळा हा फक्त व्यसनी लोकांनाच समजू शकतो. या कंटाळ्याला उपाय नाही. पण फक्त सिगरेट, तंबाखू नंतर पुढची स्टेज म्हणजे ड्रग्ज वगैरे घेण्यापर्यंत मुलांची झेप जाऊ नये एवढीच इच्छा. मी स्वतः पण सिगरेट , तंबाखू ओढायचो, पण गेल्या कित्येक वर्षापासून बंद केली आहे. जेंव्हा तुम्ही सिगरेट सोडता, तेंव्हा जो कंटाळा येतो तो असह्य असतो, ही गोष्ट मी अनुभवली म्हणून सांगतोय. कंटाळा हा कधी प्रॉडक्टिव्ह होऊ शकतो का? कदाचित ह्याचं उत्तर होय असे दिले जाऊ शकेल. मनोरंजनाची एक लिमिट असते, तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात, की मग पुन्हा पुन्हा त्या पेक्षा वरचढ मनोरंजन हवे असे वाटू लागते, नाहीतर मग त्या मनोरंजनाचा पण कंटाळा येऊ लागतो. मनोरंजनाचा अतिरेक हा टाळण्याची सवय अगदी लहानपणापासूनच लावून ठेवली , तरच पुढल्या आयुष्यात थोडं संथ आयुष्य जगायची सवय लागु शकते. माझ्या एका मित्राच्या चार वर्षाच्या मुलाला दिवसभर कार्टुन नेटवर्क पहाण्याची सवय आहे. रविवारी तर दिवसभर कार्टून पहात असतो. अशी काही न करता करमणुकीची सवय झाली की मग हात पाय हलवायची पण इच्छा होत नाही, मग व्यायाम तर दूरच राहिला. तरुणांसाठी फेस बुक सारख्या सोशल साईट्स कंटाळा आला की वेळ घालवण्याचे साधन म्हणून वापरले जाते, पण खरंच त्याने कंटाळा जातो का? हा प्रश्न आहेच. जाता जाता एक गोष्ट सहज लक्षात आली, की अंबानीज, गोदरेज, वगैरे मंडळींकडे तर खूप पैसा आहे, आयुष्यभर काही न करता पण ते आयुष्य घालवू शकतात .दररोज काहीतरी चित्तथरारक गोष्टी अनुभवणं त्यांना शक्य होत असेल का? की त्यांना पण कंटाळा येत असेल? माझं मत आहे, की त्यांना पण नक्कीच कंटाळा येत असेल. एकदा तुम्ही मनोरंजनाचा हाय डोझ रात्री घेतला, की मग सकाळी उठल्यावर जी पहाट होते , ती रात्रीच्या तुलनेत नक्कीच कंटाळवाणी होत असेल नाही का? तुमच्या कडे कितीही पैसा असला तरीही, जीवनात दररोज काही तरी थ्रिलिंग घडवून आणणे शक्य नाही हे नक्की! करमणुकीच्या अतिरेकाने मन आणि शरीर दोन्ही थकून जातं. संवेदना बोथट होतात, म्हणूनच म्हणतोय, कंटाळा आला, तरीही तो एंजॉय करायला शिका, कंटाळ्यातही एक वेगळीच मजा आहे. जर तुम्ही एकसुरी आयुष्यामध्ये येणारा कंटाळा मान्य करण्याची शरीराला आणि मनाला सवय लावाल, तर आयुष्य एकदम सोपं होऊन जाईल. कंटाळा आला , की मग सगळे जण काही तर कर , सिनेमा पहा वगैरे सांगून कंटाळ्याला दूर करा असा सल्ला देतात, पण मी म्हणतो,कंटाळा आलाय ना? ” बी विथ इट” आणि कंटाळा पण एंजॉय करा. रसेल चा एक लेख वाचला होता, तो सारखा आठवत होता लिहितांना.आता तुम्हाला ह्या कंटाळ्याची कंटाळवाणी पोस्ट वाचून जर कंटाळा आला असेल तर जे वाचलं ते विसरून जा! मला पण कंटाळाच आलाय, म्हणून हे पोस्ट लिहिलं आहे.:) ✍Regards, Sagar Patil Software Engineer | SILICUS TECHNOLOGIES |Tel: +91-20-30243100 EXT: 225|www.silicus.com Development Center: South Wing, 1st Floor, Suma Center, Erandwane, Pune 411 004 Headquarters: 13131 Dairy Ashford, Suite 210, Sugar Land, TX 77478

मराठी मुलं किंवा मुली तसे जरा फास्टच असतात प्रेमात पडण्याच्या बाबतीत


मराठी मुलं किंवा मुली तसे जरा फास्टच असतात प्रेमात पडण्याच्या बाबतीत. तशीही प्रत्येकाचीच इच्छा असते एकदा तरी प्रेमात पडावं. युजवली जवळपास ९० ट्क्के मुलं ही ’तुझं आहे तुज पाशी, परी तु जागा चुकलाशी’ या उक्ती प्रमाणे आपलं ’प्रेम’ कुठे आहे ते ओळखू शकत नाहीत,ते वेळेवर न ओळखल्या मुळे त्या प्रेमाचं कुठे तरी लग्नं ठरतं आणि मग हात चोळत बसावं लागतं. प्रेम कोणावर करावं हा तर सगळ्यात मोठा कधीही न सुटणारा प्रश्न. सगळ्यात सोपं म्हणजे बालपणीची मैत्रीण.. ही म्हणजे अगदी सेफ असते. पण होतं काय, की ज्या मुलीला ( मुलींच्या बाबतीत मुलाला) लहान पणी शेंबुड पुसतांना आणि चड्डीची नाडी लोंबतांना पाहिलं असतं, मोठा झाल्यावर त्याची / किंवा तिची ती नाक पुसणारी प्रतिमा काही विसरली जात नाही, त्या मुळे सुरवंटाचं फुलपाखरु झालंय हीच गोष्ट दुर्लक्षिली जाते.. ही गोष्ट बहुतेक ९९ ट्क्के लोकांच्या बाबतीत खरी असते, अगदी एक टक्का लोकंच या सुरवंटाचं फुलपाखरात झालेलं रुपांतर ओळखू शकतात, आणि खरं सांगतो, तेच लोकं खरे शहाणे असतात. प्रत्येकच मुलगा कॉलेज मधे गेला, की हिंदी सिनेमातल्या हिरो प्रमाणे एखादी सुंदर मुलगी आपल्या प्रेमात पडणार असं त्याला वाटू लागतं. कधी बरोबर ट्रेक ला गेलो, किंवा कधी एकत्र सिनेमाला गेलो की स्वर्गाला हात पोहोचल्या सारखे वाटतात. जाउ दे.. वर जे लिहिलंय ते माझे विचार आहेत.. पण …बाळ सामंतांची एक कथा वाचली होती.. की मुली कशा पटवाव्या म्हणून. हा लेख म्हणजे प्रेम करणाऱ्यासाठी एक रेडी रेकनर होऊ शकतो , असं वाटलं म्हणून थोडक्यात इथे त्यातलेच मुद्दे घेउन लिहितोय. आरडी मधे जशी कंडेन्स्ड कादंबरी असते तसं. मागच्या वर्षी अवाज ने ५० वर्षं पुर्ण झाल्याबद्दल एक सिलेक्टिव्ह लेख असलेला अंक काढला होता . त्या मधे दरवर्षीचा उत्कृष्ट लेख त्यात इन्क्लुड केला होता. त्या अंकामध्ये हा लेख वाचण्यात आला.१९६५ सालच्या आवाज मधे आली होतं हे छापून.मुळ लेख आहे १९६५ चा तेंव्हा कालानुरूप थोडे बदल केले आहेत लिहितांना. आता यात दिलेल्या कलुप्त्या या फार जुन्या काळच्या आहेत.. तरी पण आजही त्या पर्फेक्ट ऍप्लिकेबल आहेत.यातल्या बऱ्याचशा युक्त्या या मराठी कथा कादंबऱ्यांमध्ये वापरलेल्या आहेत, त्या मुळे कदाचित तुम्हाला असंही वाटेल की हे काय… हे तर सगळं माहितीये आम्हाला…. १) बसमधे आपल्या शेजारी बसलेली आणि नेमकं तिकिट काढण्यासाठी तिच्याकडे सुटे पैसे नसणं, आणी तो खविस कंडक्टर सुटे पैसे द्या नाहितर खाली उतरा असं म्हणणार, तेवढ्यात तुम्ही जवळचे सुटे पैसे काढून देता आणि……पुढे तुमच्यावर अवलंबून कुठपर्यंत केस नेता ते. २)ट्रेनमधे भरपूर मराठी वाचनीय साहित्य घेउन चला, नशिबाने समोर एखादी सुंदरी असली, तर ती नक्कीच तुम्हाला अहो, ते पुस्तक जरा देता का वाचायला म्हणून पुस्तक मागेल, आणि मग ओळख …. वगैरे…. ३) खूप लोकप्रिय सिनेमाची तिन तिकिटे काढावी. सिनेमा हाऊस फुल्ल जाणार आहे याची खात्री करुनच हे काम करा. सिनेमा सुरु व्हायची वेळ झाली की बाहेर कोणाची तरी वाट पहातोय असा आव आणा, आणि सारखं घड्य़ाळाकडे बघत रहा. हाउस फुल्ल चा बोर्ड लागला की दोन सुंदर तरुणी , ज्यांच्याकडे तिकिटं नाहीत अशांना हेरून त्यांना तिकिटं आहे त्याच किमतीत ऑफर करा.. आणि सांगा की आमचा मित्र यायचा होता पण आला नाही म्हणून…. आता इथे दोन तिकिटंएक्स्ट्रॉ कशाला??? तर याचं कारण म्हणजे मुली एकट्या कधीच सिनेमाला जात नाही्त, एक तर बॉय फ्रेंड तरी असतो, किंवा एखादी मैत्रीण तरी असतेच.तुम्ही मैत्रिणी बरोबर आलेल्या मुलीचा शोध घ्यायचाय हे ध्यानात ठेवा.. जर एकही मुलगी भेटली नाही , तर तीच तिकिटे.. मी ब्लॅक मधे घेतली आहेत असं म्हणून चढ्या किमतीत कुणाही माणसाला विकून टाका. ४)टॅक्सी साठी उभे आहात, आणि बऱ्याच वेळानंतर टॅक्सी आली की टॅक्सि हायर करुन तिला लिफ्ट ऑफर करा.. ५)मुंबईला मरिन लाइन्स वर फिरत असतांना एकदम जोरात पाउस येतो, आणि नेमकी तुमच्या समोर एक सुंदर ललना तयार होऊन कुठे तरी जात असते, जवळपास कुठेच आडोसा नाही, तेंव्हा प्रवास करतांना नेहेमी मोठ्ठी छत्री घेउन चला काय सांगावं कधी उपयोगी पडेल ते??….. ६) एखादी आपल्या घराच्या आसपास रहाणारी सुंदरी हेरुन ठेवा. तिची रोजची प्रवास करण्याची गाडी हेरुन ठेवा, आणि तुम्ही पण शक्यतो त्याच गाडीने प्रवास करा. एकदा तुम्ही स्टेशनवर उतरलात की शेअर रिक्शा वगैरे साठी ऑफर करु शकता. तिच्या येण्याच्या वेळाचे पण पालन करा. म्हणजे पुढे जमण्याची शक्यता जास्त असेल. ७)मुलींमधले धार्मिक प्रवृत्ती फार वाढीस लागलेली आहे , त्यामुळे सिध्दिविनायक, साईबाबा इत्यादी चलतीच्या देवांच्या मंदिरात जाणं सुरु करा. चेहेऱ्यावर शक्य तेवढे बावळट भाव ठेऊन हातात, फुलांची परडी घेउन रांगेत अशा तर्हेने उभं रहा, की तिच्या नजरेस तुम्ही पडाल.एकदा तिचा विश्वास बसला की तुम्ही इतरांसारखे नाही, तेंव्हा हळूच ओळख वाढवायला हरकत नाही. अरे वा…. तुम्ही पण येता का सिध्दी विनायकाला?? जागृत देवस्थान बरं कां.. असं म्हणत मंदिराच्या कळसालाच बघून हात जोडा आणि पुढे तुमच्याच हातात आहे सगळं…. ८)गणपती विसर्जन ,दहीहंडी अशा इव्हेंट्स कधीच चुकवू नका.अशा प्रसंगी मुलींना बाहेर फिरायला खूप आवडतं. ९) टिपीकल मराठमोळ्या मुली या नाटकालाच भेटतातच, इथे पण तशीच दोन तिकिटं एक्स्टॉची आयडिया उपयोगी पडु शकते. १०)दुचाकी वर लिफ्ट द्या. शक्य होईल तेंव्हा मी तिकडेच जातोय, चला तुम्हाला सोडून देतो, असं म्हणून लिफ्ट द्यावी. हल्ली चेहेरा ओढणीने झाकून प्रवास करण्याची पद्धत आहे, म्हणजे कोणी ओळखेल याची भिती नसते. मुलींचे प्रकार किती तरी असतात . प्रत्येक प्रकारच्या मुलींशी मैत्री करण्याचे हातखंडे पण वेगवेगळे असतात. १)स्कॉलर मुली, ज्या केवळ वाचन, अभ्यास यामधेच इंटरेस्ट घेतात त्या.तुम्ही पण शुन्य नंबराचा चष्मा लावून अभ्यासु आहात असा आव आणला, आणि तिला मला ते मेकॅनिक्स फारच जड जातंय हो, किंवा मला सी प्लस जरा समजत नाही, कारण माझं १२वीला व्होकेशनल नव्हतं म्हणून.. वगैरे म्हणावं आणि मदत मागावी. २)वांड्गमय प्रेमी , अशा मुलींना पुलं , वपु, अशा लेखकांच्या फॅन असतात.यांना गटवायच असेल, तर तुमचं पण त्या विषयातलं ज्ञान भरपूर असायला हवं, जर तुम्हाला पण अशा लेखकांच्या किमान काही पुस्तकांची नावं माहिती असतील तर या प्रकारातल्या मुलींशी गप्पा मारता येतात, आणि तद्नंतर प्रेम पण करता येउ शकतं. तुम्हाला त्या लेखकांची काही पुस्तकं तरी वाचावीच लागतील, म्हणजे कधीही डिस्कशनचा मुद्दा निघाला की तुम्हाला पण थोडं बोलता येईल त्या विषयावर. आता या मुलींना कसं ….?? तर अगदी सोप्पं आहे,तुम्ही उपरोक्त लेखकाचं एखादं पुस्तक स्वखर्चाने विकत घ्या, आणि नंतर त्याच्या पहिल्या पानावर.. स्नेही.. श्री.. तुमचं नांव.. यांना सप्रेम भेट असं लिहुन खाली त्या लेखकाची सही करा.. ते पुस्तक तिला भेट द्या.. आणि सांगा की हे लेखक माझे चांगले परिचित आहेत.त्यांनी स्वतः भेट दिलेलं हे पुस्तक तिला भेट द्याल, तर तिचा तुमच्यावरचा विश्वास, अन प्रेम नक्कीच सुयोग्य दिशेने वाढू लागेल… . आणि नंतर…….नंतर काय ते सगळं कांही तुमच्याच हातात आहे. ३) कलावंत:- या प्रकारातली जर तुम्हाला आवडणारी मुलगी असेल तर तुम्हाला, कलाकार, नेपथ्यकार, वगैरे प्रकारात प्राविण्य मिळवावे लागेल.एखादा लहानसा रोल पण त्या नाटकातला पदरी पाडुन घेता आला तर ते पण करावं , म्हणजे तालमीच्या वेळेस ऑफिशिअली तिथे जाता येईल. जर हे शक्य नसेल तर कमीत कमी तुम्हाला एखाद्या नाट्य मंडळाचा सभासद होऊन तिथे तालीमीच्या वेळेस जाणं येणं सुरु ठेवावं लागेल. रात्री उशीर झाला ( तालिमीला) की मी सोडतो ना घरी.. माझ्या बाईक वर … असं म्हणून लिफ्ट देणं.. वगैरे वगैरे.. बरेच प्रकार आहेत. सुज्ञास जास्त सांगणे न लगे.. ४)खेळाडु:- तुम्ही शंभर पाऊंड वजनाचे किंवा लेंग्याची नाडी न सांभाळता येणारे असाल तर कठिण आहे. ट्रेकिंग , वगैरे प्रकारात इंटरेस्ट असणं आवश्यक आहे . ट्रेक ला गेल्यावर आपण कचरा वगैरे कसा आपल्या बॅगेत भरुन खाली आणतो, आणि मग ड्स्ट बिन मधे फेकतो आणी निसर्ग वाचवण्यास हात भार लावतो हे रंगवून सांगा. आणि लिंगाणा सर केला होता ना…. तेंव्हा अशी सुरुवात करा…. म्हणजे ह्या प्रकारच्या मुली लवकर मैत्री करतील. ५)चित्रपट प्रेमी:- अशा प्रकारच्या मुलींची अजिबात कमतरता नसते. विद्वान ब्राह्मणा प्रमाणे, कुठल्या चित्रपटात कोणी काम केलं कोणाचं संगीत आहे, हिरोच्या लहान भावाचं नाव, किंवा होरोइनच्या बहिणीचा वाढदिवस वगैरे माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. चित्रपटातल्या हिरो , हिरोइन्स ची नावं अगदी संध्येतल्या चोविस नावाप्रमाणे पाठ असायला हवित. केंव्हाही कधीही सिनेमा पहाण्याची तयारी आणि एक्स्ट्रा तिकिट यांचा खर्च करण्याची तयारी ठेवावी लागेल. एखादा खूप गाजलेला सिनेमा जेंव्हा रिलिझ होतो तेंव्हा दोन तिकिटं रांगेत उभं राहुन ऍडव्हान्स बुक करुन ठेवावी.. आणि तिला पण चलतेस का म्हणून विचारलं, तर ती १०१ टक्के हो म्हणणार याची खात्री देतो मी. अशा तर्हेने ओळख वाढवा…! ६)वर्गभगिनी:- हिच्या कडे वर्गातल्या बऱ्याच बांधवांचं लक्षं असतं. तेंव्हा तुमचा नंबर इथे लागण जरा कठिणच , पण काही झालं तरीही प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे.. असंही होऊ शकतं म्हणून प्रयत्न सोडु नये. ७)शेजारीण: – शेजाऱ्यावर प्रम करा हा येशु चा संदेश आहे हे खरं, पण शेजारच्य सुमीची आई पण डोळ्यात तेल घालुन तिच्यावर नजर ठेऊन आहे हे विसरू नका.तसेच इतर शेजारी पण तुमच्यावर नव्हे तर तिच्यावर कायम नजर ठेउन असतात, तेंव्हा तुमची प्रत्येक स्टेप ही कमित कमी दहा लोकं पहाणार आहेत हे लक्षात घेउनच स्टेप्स घ्या.तुम्ही काळजी पूर्वक पणे या प्रश्नाचा ध्यास घेतलात तर हा प्रश्न सुटू शकतो अगदी चुटकी सरशी… ८)कचेरीतली सहकारी:-यावर काही लिहायची गरज आहे असं वाटत नाही.आपण सगळे जाणकार आहातच ,काय?? बरोबर नां? ९) मित्र भगिनी:- हे फारच अवघड नातं असतं.जर तुम्हाला सुंदर बहीण असेल , तर इतर मुलं तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला सिनेमाचे पास, नाटकाचे पास, वगैरे देतील, तुमच्या घरी येण्यासाठी काहीही करायला तयार असतील. हा प्रकार जरा डेंजरसच असतो. तेंव्हा सांभाळुन.. ओळख कशी वाढवावी?? आजकालच्या तरुणांना याची काहीच गरज नसावी.तरी पण, एकदा ओळख झाली की मग.. थापा मारणे सुरु करणे अतिशय आवश्यक आहे. माझं तुझ्यावर प्राणा पलिकडे प्रेम आहे, लाडके, तु माझी झाली नाहिस तर जीव देईन, चल आपण पळून जाउन लग्न करु, इत्यादी प्रकारचे डायलॉग्ज वेळोवेळी ्बोलत रहाणं प्रेम बहरण्यासाठी अतिशय आवश्यक आहे भेटण्याच्या जागा? चला प्रेम तर जमलं.. आता भेटायला जागा कुठल्या? या मधे ्खूप जागा असु शकतात. पण ज्या सर्व मान्य जागा आहेत, त्या म्हणजे बागा, आर्ट गॅलरीज, चाळीतली गॅलरी, बस स्टॉप , र्लोकलचा प्लॅटफॉर्म, चाळीचा जीना, बॉक्स.. ( हल्ली हा नसतो, पण पुर्वी बॉक्स हा पण एक क्लास होता सिनेमा चा जिथे केवळ दोघांची बसण्याची सोय असायची) समुद्राचा किनारा, आरे कॉलनी चा छोटा काश्मिर अशा अनेक जागा जाणकार लोकं सांगु शकतील. मी स्वतःचा अनुभव सांगतो, नागपुरमधला असा एकही बगिचा नाही की जिथुन आम्हाला हाकललेलं नाही.. !!! असो!!! वरचा लेख तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा आहे. तर मंडळी आता कामाला लागा लवकर.. !!!

रोमॅंटीक आयडीयाज..


रोमॅंटीक आयडीयाज.. जगात सगळ्यात जास्त काय महत्वाचे असेल तर ते स्वतः मधला रोमॅंटीक ’किडा’ जिवंत ठेवणे. आता वय कितीही असो.. अगदी १६ ते ७५ रोमॅंटीझम शिल्लक असेल तरच आयुष्यात काहीतरी थ्रील शिल्लक रहातं. या रोमॅंटिक वागणं- म्हणजे केवळ ’तिला’ महागड्या हॉटेलमधे घेउन जाउन खूप खर्च करणे, किंवा फार तर एखाद्या सिनेमाला तिला घेउन जाणे, किंवा साडी , ड्रेस, जिन्स घेउन देणे असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते पुर्ण चुकीचे आहे.. पण खरंच असं असतं का?? स्त्रियांच्या रोमॅंटीझम च्या कल्पना काय बरं असतात?? एम ऍंड बी मधे कसे मस्त रोमॅंटीक प्रसंग असायचे? तसंच काही तरी आपल्याही बाबतीत घडावं असं प्रत्येकच मुलीला वाटत असतं. लग्न होऊन इतकी वर्ष झालीत म्हणून काय झालं?? तुमच्या मनातला तो मदनबाण तरुण आहे नां? माझ्या फेवरेट आयडीयाज.. इथे आहेत.. १)तिचा वाढदिवस आहे.. किंवा लग्नाचा वाढदिवस समजा १२ वा… तुम्ही कुठे तरी बाहेर घेउन गेला आहात मे बी शॉपिंग मॉल मधे. एक १२ गुलाबाची सुंदर फुलं घ्या विकत. एका खांबाच्या आड उभे रहा आणि एखाद्या येणाऱ्या माणसाला एक फुल तिला द्यायला सांगा.. आणि म्हणायचं.. हॅपी ऍनिव्हर्सरी.. असे ११ फुलं निरनिराळ्या लोकांच्या तर्फे ( ज्या पैकी काही पुरुष काही स्त्रिया आणि एखादं लहान मुलं पण चालेल) देउन झाले की १२ वं ्फूल तुम्ही स्वतः तिला द्या.. आणि म्हणा….. ( आता ते पण मीच सांगु का?) २)जर लग्न झालेलं नसेल, अ्जूनही डेटींग करित असाल, तर हाताची झेरॉक्स काढून त्यावर लिहा .. :तुला हा हात तुला आपल्या हातात आयुष्य भरासाठी धरुन ठेवायला आवडेल का?” आणि तो पेपर स्कॅन करुन तिला इ मेल करा. तिला म्हणाव, की उत्तर हो असेल तर आपल्या हाताचा ठसा त्यावर काढून परत पाठव. ३)तिच्या आवडत्या लेखकाचे पुस्तक जुन्या बाजारातून विकत घ्या. त्यावर त्या लेखकाची फेक सही स्वतःच करा ( सहीचा नमुना कुठेही सापडेल ) आणि तिला गिफ्ट रॅप करुन द्या.. ४)एक सुंदरशी लव्ह स्टॊरी लिहिणे सुरु करा. मुख्य पात्र तुम्ही दोघंच . ( अगदी रिअल स्टॊरी नको..थोडं काल्पनिक, थोडं खरं) पहिला पार्ट म्हणजे तुम्ही कसे आणि कुठे भेटलात , कशी मैत्री झाली, कसे तुम्ही तिच्या प्रेमात पडलात, आणि तिला सांगतांना तुम्हाला कशी भिती वाटते – कारण तिने नाही म्हंटलं, तर मैत्री पण संपून जाइल म्हणून वगैरे वगैरे…. आणि मग तिला पाठवुन द्या.. म्हणा, पुढल्या भागात काय होणार आहे ते तुलाच माहिती आहे, म्हणून तूच लिहुन पाठव…. आणि गोष्ट पुर्ण करुन मला परत पाठव. ५)पर्सनलाइझ्ड मॅग्झिन कव्हर बनवा तिच्या फोटोचं अन तिला इ मेल करा. कसं बनवायचं? शोधा गुगलवर, नाही सापडलं, तर मला विचारा.आणि स्टॊरीचं हेडींग कुठलं?? तर सगळ्यात सुंदर मुलगी…. असं काहीतरी… ६)पंचविस गॅसचे फुगे विकत घ्या. त्या सगळ्यांच्या दोरा एकत्र बांधुन त्याला एक लहानशी कागदाची पाटी लावा.. आय लव्ह यु ची.. हे सगळं सामान ठेवा आपल्या कारच्या डिकी मधे. बाहेर कुठे तरी फिरायला जा.. लॉंग ड्राइव्हला.. समुद्रावर वगैरे… आणि तिला सांगा, की माझी वॉटर बॉटल डीकी मधे आहे ती आणतेस?? अन तिला चावी द्या कारची. ती कारची डिकी उघडेल आणि सगळे फुगे एकदम बाहेर येतील, तुम्ही बनवून ठेवलेल्या आय लव्ह यु नोट सह.. ७)होळीच्या दिवशी.. आम्ही होळी खेळत नाही बॉ.. वगैरे तर नेहेमीच ऐकता तिचं.. या वेळी एक काम करा. दोन पिचकाऱ्या आणून ठेवा, आणि होळीच्या दिवशी तिच्या नकाराची पर्वा न करता तिला भिजवा.. दुसरी पिचकारी पण तिला सापडेल अशीच ठेवा.. किंवा ती झोपेत असतांना तिला गुलालाने रंगवा.. तिच्या नकळत, ८)बायको असेल ,तर तिची तारीफ करा , इतरांसमोर.. शक्यतो एखाद्या कॉमन पार्टी मधे मित्रांच्या गृप मधे जसे.. ही ना, चिकन बिऱ्याणी मस्त बनवते. अरे अगदी ’लकी मधली’ हैद्राबादी बिर्याणी पण झक मारते हिच्या हातच्या बिर्याणी समोर. अन हे सगळं करतांना तिचा हात हलकेच दाबा.. करेक्ट बॉडी लॅंग्वेज पण महत्वाची असते बरं कां… ९)जर मुलं घरात असतील तर त्यांची सोय करा एखाद्या चांगल्या मित्राकडे.. अन शुक्रवारी अनाउन्स करा.. की……….. १०)एक सुंदरसा बॉक्स घ्या विकत. त्या मधे दर महिन्याला काहीतरी एक गिफ्ट ठेवत जा.. लहानसच.. पण न चुकता..पैसे नसतील तर लहानसं चॉकलेटपण चालेल. ११)गर्ल फ्रेंड असेल, तर तिची हॉबी काय ते शोधून काढा. यासाठी तिच्या मैत्रिणीचा उपयोग होऊ शकतो. त्या हॉबी ला उपयुक्त अशी एखादी वस्तु भेट दिलेली तिला खूप आवडेल. १२)सकाळी ती उठण्यापूर्वी तिच्या साठी कॉफी बनवून ठेवा.. आणि ती उठल्या बरोबरच तिच्या हातात कप द्या आणि मग पहा…. काय होतं ते! १३)पिलो फाइट.. खास पिलो आणा विकत. पिलो ला छिद्र पाडुन ठेवा.. म्हणजे त्यातली पिसं बाहेर उडतील.पिलो फाइट मधे ्खूप मजा येते बरं कां.. आणि पिलो फाटली असेल तर अजूनच! १४)लग्नाचा वाढदिवस आहे?? मग सोपं आहे. तिला ऑफिसच्या जवळ बोलवा, ऑफिस संपायच्या वेळेस, आणि दोघंही एक मेकांना ओळखत नाही, आणि पहिल्यांदाच भेटाताहेत असं भासवून - सरळ एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेल मधे घेउन जा, जिथे एक रुम बुक केलेली असेल ..आणि नंतर पुढे…… १५)तिचा वाढदिवस आहे ?? तिला तिच्या वया इतके फुलं द्या गुलाबाची. त्यामधे एक प्लास्टीकचं फुल ( अगदी खरं दिसणारं ठेवा) आणि तिला सांगा की शेवटचं फूल टवटवीत राही पर्यंत मी तुझ्यावर प्रेम करीन. १६)गॅसचे फुगे आणा विकत.. तिच्या कपाटात ते फुगे भरुन ठेवा. त्याला एक पेपर लावा.. हॅपी बर्थ डे चा… सरप्राइझ इज द की ऑफ सक्सेस हे लक्षात ठेवा. १७)बायकॊ समजा लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जात असेल, तर तिला सांगा, की मला तुझी खूप काळजी वाटते म्हणुन तुझ्या साठी मी एक बॉडी गार्ड आणलाय, अन तिच्या हातात एक लहानसा टेडी द्या.. १८)तिला वाचनाची सवय आहे?? ती एखादं पुस्तक वाचते आहे क? तर तिचं जितकं वा्चून झालंय त्याच्या पुढे काही अक्षरांखाली पेन्सिलने मार्क करा, आणि तिला सांगा की सिक्रेट मेसेज आहे त्यात. मग तो काहीही असू शकतो.. सिनेमाची तिकिटं तुझ्या पर्स मधे आहेत वगैरे.. उदाहरणार्थ या वाक्यात मी तुझ्यावर प्रेम म्हणजे काही भावना नाही तर मी ते करतो हे म्हणणं एक मोठ कठिण काम आहे.. १९)खेळ.. हा पण एक चांगला ऑप्शन आहे. स्पेशिअली रमी.. किंवा तत्सम पत्त्यांचा खेळ, अर्थात गेम विथ बेट्स… आता ’बेट’ काय ते तुम्हीच ठरवा… २०)तिच्या वाढदिवसाला तिच्या ऑफिसमधे फुलं पाठवा.. सोबतच चॉकलेट्स पण. तिला सगळ्यांसमोर फुलं आलेले बघून खुप एंजॉय करता येइल आणि इतर मैत्रीणींवर माझा नवरा बघ कसा माझ्याकडे लक्ष देतो म्हणून थोडं मिरवता पण येइल. २१)मुलींना झोपाळ्यावर बसायला खूप आवडतं. तिला फिरायला घेउन जा. एखाद्या बगिच्यात तिला झोपाळ्यावर बसवुन झोका द्या. कितीही वय असो मुली हा खेळ नेहेमीच एंजॉय करतात, आणि जेंव्हा झोपाळ्यावरून उतरतात तेंव्हा एकदम फ्रेश अन बब्ली असतात… २२)हेअर ब्रश घेउन तिचे केस विंचरत बसा. हे शक्यतो रात्री झोपण्याच्या वेळेस करा.. कमित कमी ३ ते ५ मिनिटे.ती एकदम रि्लॅक्स होईल आणि मग पुढे ….. तुमच्या हातात आहे सगळं. मेल मधे वाचलेलं , मित्रांकडुन ऐकलेलं आणि थोडं अनुभवलेलं जे काही आहे, ते इथे लिहिलं आहे बरं का. आणि अजुन काही टिप्स माहिती असतील तर इथे लिहा कॉमेंट्स मधे..

फ्लॅट ची कींमत


Please read till end.... असं समजा की एक 2BHK फ्लॅट विकायचा आहे. त्या फ्लॅट ची कींमत ५० लाख आहे. आणि बँक तुम्हाला त्याच्या एकूण किमतीच्या ८५% कर्ज देऊ करत आहे. आपण धरून चालु कि हे कर्ज आपण २० वर्षांसाठी घेतो आहे. आणि आता खाली दिलेले "calculation " पहा. घर घेण्यासाठी तुम्ही स्वतः दिलेले contrbution १५% : रुपये ७.५ लाख ( यामध्येच सगळी बचत/जमापुंजी संपुन जाते !) गृह कर्ज : रुपये ४२.५ लाख दरमहा येणारा EMI (व्याजदर ११%) : रु .४७००० maintenance charges दरमहा : रु .२००० मालमत्ता कर दरमहा (Property tax) : रु .१०००-१५०० गृह कर्ज व्याजावर मिळणारी कर सवलत : दरमहा रु .४००० ( ते ही फक्त पहिल्या काही वर्षांपर्यंतच ) म्हणजे घरासाठी येणारा एकूण खर्च (अंदाजे) दरमहा : रु. ५०००० (मेंटेनन्स चार्जेस आणि कर हे भविष्यात महागाई दराप्रमाणे वाढण्याची शक्यता आहे.) आणि दरमहा एवढे सगळे पैसे दिल्यानंतर - १. प्रत्येक वेळी तुमच्या कुटुंबाला खरेदीसाठी नकारघंटा ऐकावी लागणार (जरी तुमचा पगार ७० ते ८० हजार असेल तरी) २. पहिल्या काही वर्षांसाठी तरी खर्चावर संपुर्ण नियंत्रण , Family holiday आणि नविन गाडीचा प्लान पुढे ढकलला जाणार :-) ३. आणि जर या काळात नोकरी गेली, कामावरुन बडतर्फ केले (जे मंदीच्या काळात हमखास होते !) तर तुमची आर्थिक गणिते अशी काही बिघडतील की काही खैर नाही. २० वर्षांनंतर तुम्ही दिलेली एकुण रक्कम असेल : ( ५००००० X २० X १२ ) + ७५०००० = १२७५०००० = रुपये १.३ करोड आणि एवढे सगळे करुन करून तुम्हाला काय मिळालं तर एका २० वर्ष जुन्या असलेल्या society मधला एक २० वर्ष जुना झालेला फ्लॅट. २० वर्षांनंतर तुमच्या 2 BHK घराची (market price ) किंमत १.५ करोड असेल. आणि 20 वर्षात एका घराशिवाय काहिही मिळाले नसेल. हेच घर जर तुम्ही घर भाडयाने घेतले तर तुम्हाला जास्तित जास्त घरभाडे १०००० येईल. इतर सगळा खर्च मिळून , आणि असं समजून चालूया की भाडे दरवर्षी ८% दराने वाढेल ( खरे तर कमीच वाढेल). प्रतीवर्षी तुम्ही दिलेलं घरभाडे असेल १.२ लाख, १.३ लाख, १.४ लाख......... याच दराने २० वर्षांनंतर तुम्ही भरलेलं एकुण भाडे असेल ................फक्त ६० लाख. फायदे - १. तुम्ही कधीही घर बद्लु शकता. अगदी एखाद्या छोट्याशा कारणासाठी देखिल ! २. अचानक परगावी किंवा परदेशी स्थायीक होण्याची संधी मिळाली तर तुम्ही सहजगत्या ती संधी स्वीकारु शकता. ३. आपल्या सोयीनुसार ऑफीसच्या जवळ, मुलांच्या शाळेच्या जवळ घर घेऊ शकता. ४. तुमच्या वाढत्या कुटुंबासाठी 3BHK फ्लॅट कधीही घेउ शकता. ५. राहत्या घराचे भाडे जसजसे वाढेल त्यानुसार HRA मध्ये कर सवलतही मिळेल. आता जर तुम्ही "हुशार" असाल तर काही पैसे शेअर बाजारात किंवा Mutual fund मध्ये गुंतवाल कारण तुम्ही फक्त रुपये १०००० घरभाडे देत आहात, ५०००० EMI नाही. जर तुम्ही २० वर्षांपर्यंत १५% दराने दरमहा रुपये २५००० गुंतवले ( उदाहरणार्थ तुम्ही जागा खरेदी करा किंवा Mutual Fund, PPF मध्ये गुंतवा.) जसे तुमचे घरभाडे वाढेल तसे तुम्ही गुंतवणुकीची रक्कम कमी करु शकाल, आणि तरी सुद्धा तुम्ही २.५ करोड या २० वर्षात कमवु शकता ( हे तुमच्या SMART गुंतवणुकीवर अवलंबून आहे.) आणि नंतर तुम्ही असाच एखादा FLAT तुमच्या मूलांकरिता खरेदी करु शकता आणि काही पैसे तुम्ही त्यांच्या शिक्षण आणि विकासावर सुद्धा खर्च करु शकता. Isn't it true, what do you think….. any comments? म सुरू असलेले प्रकल्प प्रकल्पाच्या बाबतीत सगळ्यात पहिली खात्री करायला हवी की , बिल्डरने आवश्यक त्या सगळ्या मंजुरी घेतल्या आहेत. अन्यथा , तो प्रकल्प कायदेशीर ठरणार नाही. आवश्यक मंजुरींअभावी काही प्रकल्प रखडल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रकल्प निश्चित करताना कागदपत्रांची छाननी व्हायला हवी. सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे जमिनीचा विकास निवासी संकुलात करण्याची परवानगी. त्यामुळे शेतजमीन किंवा उद्योगासाठीची जमीन निवासी परिसरात रुपांतरित करण्याची परवानगी सरकारकडून घ्यावी लागते. ती घेतली नसेल तर संपूर्ण प्रकल्प बेकायदा ठरतो. पर्यावरणविषयक व पालिकेकडून मंजुरी घ्याव्या लागतात. जसे की , हा प्रकल्प शहर नियोजनाच्या आड येत नसल्याची , रस्त्याच्या मध्ये येत नसल्याची खात्री बिल्डरला द्यावी लागते. आपली बाल्कनी वा टेरेस अशा आपल्या फ्लॅटच्या हिश्श्यावर बिल्डरचा कोणताही हक्क राहत नाही , याची खातरजमा आपण करायला हवी. प्रकल्पाचा आराखडा आणि प्रत्यक्ष प्रकल्प यामध्ये फरक राहतोच. स्विमिंग पूल , डिझायनर फर्निचर अशा जास्तीच्या सुविधांसाठी बिल्डर आणखी पैसे आकारतात. त्यामुळे बिल्डरने करारामध्ये आश्वासन दिलेल्या सगळ्या सुविधा व वैशिष्ट्ये प्रत्यक्षात प्रकल्पात समाविष्ट केल्या असल्याची काळजी घ्यावी. यातले एखादे वैशिष्ट्य बदलण्याचा अधिकार बिल्डरने स्वतःकडे राखून ठेवलेला असू शकतो. त्यामुळे फाइन प्रिंटचे बारकाइने वाचन करावे. तुम्हाला दाखवलेला सॅम्पल फ्लॅट तुम्हाला फ्लॅटचे पझेशन मिळण्यापूर्वी नाहीसा केलेला असू शकतो व त्याचे पुरावेही मागे ठेवलेले नसू शकतात. नंतर कटकट नको म्हणून मंजूर बांधकाम आराखड्याची पाहणी करावी आणि बिल्डरने दिलेल्या आश्वासनांशी तो जुळणारा आहे का ते पहावे. तसेच , संबंधित अधिकाऱ्याकडून मिळालेल्या मंजुरी बिल्डरला दाखवायला सांगाव्यात. ' ट्रान्स्फर ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट ' आणि ' महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट ' नुसार बिल्डरने प्रॉपर्टीसंबंधित सर्व तपशील सांगणे बंधनकारक असते. त्याने माहिती वा कागदपत्रे देणे नाकारल्यास त्या बिल्डरपासून लांब राहिलेलेच बरे. याबरोबरच , मुंबईत प्रकल्पासाठीचे ' कमेन्समेंट सर्टिफिकेट ' ही तपासून बघावे. सर्व मंजुरी घेतल्यानंतरच बांधकाम सुरू करण्यासाठी बिल्डरला हे प्रमाणपत्र दिले जाते. स्वतंत्र घरमालक सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे , प्रॉपर्टीची मालकी संबंधित मालकाकडे असल्याचे आणि ती विकण्याचा त्याला अधिकार असल्याचे तपासावे. प्रॉपर्टीची मालकी संयुक्त असल्यास अन्य मालकांच्या परवानगीशिवाय त्याला एकट्याला ती प्रॉपर्टी विकता येणार नाही. घराची मालकी तपासण्याचा एक मार्ग म्हणजे घराचे अॅग्रिमेंट पाहणे. हौसिंग सोसायटीत फ्लॅट घेत असताना मूळ शेअर सर्टिफिकेट मागावे. आणखी चाचपणी करण्यासाठी विजेचे बिल वा फोनचे बिल मागावे. ते फ्लॅटच्या कायदेशीर मालकाच्या नावाने असेल. सोसायटी मेन्टेनन्स बिलही तपासून पाहता येईल. आपण घेणार असलेल्या फ्लॅटबाबत काही बिले थकित आहेत का , याचीही कल्पना यातून येईल. मालकाने बिले थकित ठेवली असल्यास सोसायटी ती नव्या मालकाकडून वसूल करून घेऊ शकते. त्यामुळे वेळीच काळजी घेतलेली बरी. यासाठी कंपनीला ' नो-ड्यु सर्टिफिकेट ' व ' नो-ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ' देण्यास सांगावे. प्रॉपर्टीच्या बाबतीत एखादा वाद प्रलंबित असला तरी सावध व्हावे. त्याच्या निर्णयाचा फटका तुम्हाला बसू शकतो. विक्री करणारा कायदेशीर मालक नसल्याचे सिद्ध झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते. ही माहिती सब-रजिस्ट्रारच्या ' लिस पेंडर्स रजिस्ट्री ' मध्ये मिळेल. प्रॉपर्टी मॉर्टगेज केली आहे का , तेही तपासावे. असल्यास मूळ कागपत्रे कर्ज दिलेल्या संस्थेकडे असतील. त्यामुळे मालकाने घराची मूळ कागदपत्रे न दिल्यास शंकेला वाव असू शकतो. सगळे कर्ज चुकते केल्याचा दावा मालकाने केल्यास त्याला बँकेकडून मूळ डिस्चार्ज लेटर दाखवण्यास सांगावे. घोटाळ्याची शंका मिटवण्यासाठी घराच्या यापूर्वीच्या मालकांविषयीही माहिती घ्यावी. त्यासाठी वृत्तपत्रात संबंधित घर खरेदी करत असल्याची जाहिरात द्यावी आणि त्यावरील हरकती मागवाव्यात. ...

फिनिक्स’


फिनिक्स’ एका माणसाने किती आपत्तींचा सामना कारावा? नागपूरला मेडिकल कॉलेजला हिंमतराव बावस्कर जेव्हा प्रथम वर्षाचा विद्यार्थी म्हणून दाखल झाला तेव्हा अतिशय अभ्यासू मुलगा म्हणून आम्ही सिनीअर्स त्याचं कौतुक करायचो. त्याला शरीरशास्त्रावरील ग्रे चे पुस्तक तोंडपाठ आहे, असे बोलले जायचे. नंतर त्यामागची व्यथा कळली. गरीब घरातून आलेल्या व प्रसंगी रोजगार हमीवर मजुरी करून शिक्षण घेतलेल्या हिंमतरावने ‘आपण मेडिकलला नापास होऊ’ या भीतीपायी मेडिकलला येण्यापूर्वी सुटीत पुस्तक पाठ करून टाकले होते. मानसिक रोगाच्या दुर्दैवी झटक्यामुळे त्याचे शिक्षण खंडित झाले तेव्हा हा होतकरू मुलगा डॉक्टर म्हणून कायमचा संपला की काय, अशी आशंका वाटली. पण गरिबी, रोग, सरकारी नोकरीचा खाक्या, पोस्ट ग्रॅज्युएशनमधील वरिष्ठांनी केलेली अडवणूक या सर्वांमधून पार पडून फिनिक्स पक्ष्यासारखा तो परत उभा राहिला. महाडसारख्या छोट्या गावात खासगी प्रॅक्टिस करत त्याने आपली वैज्ञानिक निरीक्षणे, विचारशक्ती, प्रयत्न आणि प्रेरणा यांच्या भरवशावर कोकणामधील प्राणघातक विंचूदंशावर विकसित केलेली उपचारपद्धती अगदी अफलातून होती. पुराव्यासकट त्याने ती जागतिक वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित केली व दुर्गम भागातील अंधारात एकाकी काम करणारा हिंमतराव प्रकाशात आला. हिंमतरावमध्ये समाजातील वैद्यकीय प्रश्न बघू शकण्याची व ते सोडवू शकण्याची प्रतिभा आहे. प्रॅक्टिस करणार्या डॉक्टरांमध्ये फार क्वचितच आढळणारी वैज्ञानिक प्रयोग करण्याची व ते प्रकाशित करण्याची क्षमता व जिद्द आहे. सोबतच याचा फायदा रुग्णांना - विशेषत: गरिबांना मिळावा यासाठी धडपड आहे. आपल्या तत्त्वांसाठी किंमत चुकवण्याची तयारीही आहे. जीवनात उपसावे लागलेले कष्ट व अडवणुकीमुळे त्याच्या स्वभावात व भाषेत एक तिखट कटुतेची छटा आहे. आपल्याकडे दुर्लक्ष केले जाते, ही त्याच्या मनातली वेदना आहे. ‘लोकमत’च्या या सन्मानामुळे हिंमतरावची व्यथा दूर होईल. ग्रामीण, गरीब महाराष्ट्रातून असा वैज्ञानिक डॉक्टर आयडॉल निघावा, ही महाराष्ट्रासाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे. डॉ. हिंमतराव बावस्कर व त्यांना कायम साथ देणार्या त्यांच्या पत्नीचे या सन्मानासाठी मन:पूर्वक अभिनंदन. - डॉ. अभय बंग (आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, सामाजिक कार्यकर्ते) लढवय्या राजू शेट्टी आणि लढाऊ बाणा हे समीकरणच आहे. राजू शेट्टी हा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर कायम आघाडीवर राहून लढणारा नेता आहे. पाठ फिरवणं हा त्यांचा स्वभावच नाही. मुख्य म्हणजे कोणतीही अनुकूलता नसताना सर्वच गोष्टी स्वबळावर त्यांनी मिळविल्या आहेत. सातत्य हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य. कोणताही प्रश्न असो, नाहीतर मुद्दा, तो धसास लावल्याशिवाय सोडायचा नाही, त्याचा पिच्छा पुरवत राहायचा आणि तो सोडवल्यावरच निवांत श्वास घ्यायचा. यामुळे माणसंही त्यांच्या मागे उभी राहतात. कार्यकर्ते जोडले जातात. अत्यंत कष्टाळू असा हा नेता आहे. अविरत कष्ट आणि संघर्ष यातूनच त्यांचं आजचं व्यक्तिमत्त्व उभं राहिलं आहे. त्यांचा व्यक्तिसंग्रहही अफाट आहे. तीच त्यांची मोठी ताकदही आहे. ‘नाटक’ हा शब्दच त्यांच्या कोशात नाही. जे करायचं ते मनापासून. आत्यंतिक तळमळीनं. एक प्रसंग मला आठवतो. मी स्वत: त्याला साक्षीदार आहे. शेतकर्यांच्या प्रश्नाविषयी कोल्हापूर जिल्ह्यात त्यांनी पदयात्रा काढली होती. त्यांचा पाय असाही सतत फिरतीवर असतो. त्यात पदयात्रा. चालून चालून त्यांचे पाय सुजले होते, कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं, तुम्ही आता चालू नका; पण त्यांनी ऐकलं नाही. त्या सुजलेल्या पायांनीच त्यांनी पदयात्रा पूर्ण केली. राजू शेट्टी स्वबळावर ‘मोठे’ झाले. माणसं मोठी झाली की, त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न ‘प्रस्थापितां’कडून होतोच. तसा तो राजू शेट्टी यांच्याबाबतही झाला; पण ते बधले नाहीत. लढणारा हा नेता वाकणारा नाही म्हणूनच जनतेलाही त्यांचं कौतुक आहे. - गोविंद पानसरे (ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते) वंचितांचा ‘एल्गार’ कोण, कुठली. कोलकात्यात राहणारी एक मुलगी; पण एका झपाटल्या ध्येयानं ती महाराष्ट्रात आली. चंद्रपूरसारख्या आदिवासी भागात गेली आणि आपलं सर्वस्व तिथे झोकून दिलं. एक छोटासा बदलही काय परिणाम घडवून आणू शकतो, हे तिच्या उदाहरणातून शिकण्यासारखं आहे. स्त्रीशक्ती (स्त्रीमुक्ती नव्हे) ही प्रचंड मोठी ताकद आहे, हे तिनं दाखवून दिलं. ही स्त्रीशक्ती तिनं जागृत केली आणि त्यातून स्त्रीमुक्तीचा मार्ग आपोआप तयार झाला. ज्यांना आजपर्यंत कुठलाही ‘आवाज’ नव्हता अशा अक्षरश: ‘फाटक्या’, अस्तित्वहीन महिलांना तिनं एकत्र केलं आणि ‘श्रमिकांचा एल्गार’ घडवून आणला. विधानसभेवर तिनं आणलेला मोर्चा अनेकांच्या स्मरणात असेल. तिच्याच प्रयत्नातून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी समिती झाली. आजही ती कार्यरत आहे. पारोमिताचा एक गुण मला अत्यंत आवडतो, तो म्हणजे तिची वृत्ती. तिची वृत्ती झाशीच्या राणीसारखी आहे. कितीही अडचणी येऊ देत, संकटांनी कितीही तयारीनिशी चालून येऊ देत, त्याला तोंड देत ती खंबीरपणे ‘उभी’ राहते. अगदी प्राणांची बाजी लावण्याची वेळ आली, तरीही ती मागे हटत नाही. दारूबंदी, व्यसनमुक्तीसाठी ज्या धडाडीनं ती लढली, त्याला सलाम करावाच लागेल; पण त्याहीपेक्षा वेठबिगारी आणि नक्षली प्रश्नावर तिनं पुकारलेला एल्गार चिरकाल आपल्या स्मरणात राहील. अनेक निरपराध नागरिकांवर बसलेला ‘नक्षलवादी’ हा शिक्का पुसून काढण्याच्या प्रयत्नात तिला स्वत:लाही ‘नक्षलवादी’ ठरवलं गेलं; पण ही जिद्दी मुलगी ना त्यामुळे बिचकली, ना मागे फिरली! वंचितांची लढाई लढायची तर ती त्यांच्यात राहूनच लढली पाहिजे, हे फार लवकर तिला कळलं. त्यामुळेच तिनं आपलं ‘स्थान’ बदललं शोधलं आणि निर्माणही केलं. - चंद्रशेखर धर्माधिकारी (नवृत्त न्यायमूर्ती) प्रेरणा आणि परीस केवळ मोठी स्वप्नं पाहाणाराच नव्हे, तर तसा विचार करणारा, नवनवी आव्हानं स्वीकारणारा आणि ही स्वप्नं प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जिवापाड धडपड करणारा एक सच्चा माणूस असंच हणमंत गायकवाड यांचं वर्णन करावं लागेल. ‘सर्वसामान्य’ आणि सामान्यांसारखा विचार करणं या माणसाला बहुधा जमतच नसावं. म्हणूनच अक्षरश: शून्यातून तो विश्व निर्माण करू शकला. जिथे अक्षरश: काहीच नसतं तिथेही या माणसाला ‘मोठी संधी’ दिसते आणि हा माणूस कामाला लागतो. आत्मविश्वास हा त्यांचा सर्वांत मोठा गुण आहेच; पण अशा संधी कवेत घेताना त्यांचा आत्मविश्वास आणखी फुलारून येतो. विशेष म्हणजे ही संधी त्यांना स्वत:साठी नको असते. जे नेहमीच उपेक्षित राहिलेले आहेत, आत्यंतिक गरजू आहेत त्यांच्यासाठीच संधीचा हा शोध असतो. टाटा मोटर्समध्ये इंजिनिअर म्हणून काम करतानाही त्यांना सतत तोच ध्यास असायचा. ‘भारत विकास प्रतिष्ठान’च्या माध्यमातून त्यांनी ‘हाऊसकीपिंग’ सेवेची सुरुवात केली त्यालाही हाच सामाजिक वसा आणि वारसा आहे. हजारो बेरोजगार हातांना त्यांनी नुसतं कामच दिलं नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांचीही आप्तांप्रमाणे काळजी घेतली, घेतात. त्यांचं संघटन आणि संपर्ककौशल्य वादातीत आहे. जमशेदपूरला काम सुरू करतानाही त्यांना अनेकांनी संभाव्य धोक्यांची कल्पना दिली होती; पण सारीच आव्हानं त्यांनी नुसती पेललीच नाहीत, तर त्यात ते यशस्वीही झाले. त्यांचा हा प्रवास सोपा कधीच नव्हता. त्यात अनंत अडथळे आले. राजकारण्यांनीही पायात पाय घालायचा प्रयत्न केला; पण त्यातही त्यांना संधीच दिसली. आव्हानं स्वीकारणं, त्यांना आव्हान देणं आणि त्यांच्याशी झगडून त्यांना कवेत घेणं, त्यांना माणसाळावणं आणि मग इतरांच्या ती हवाली करणं हीच त्याची आजवरची वाटचाल राहिली आहे. एक वेगळी वाट चोखाळणारा आणि त्या वाटेवरची क्षितिजं कवेत घेत जाणारा आमचा हा सहकारी आजही अनेकांसाठी प्रेरणा आणि ‘परीस’ आहे. - सतीश बोरवणकर, सिनिअर व्हाइस प्रेसिडेंट, टाटा मोटर्स मातीचा आशीर्वाद मातीचा आशीर्वाद असलेला शिल्पकार या शब्दात बी. आर. तथा आप्पासाहेब खेडकर यांचे वर्णन करता येईल. आप्पासाहेब गेली ७९ वर्षं शिल्पकलेशी संसार करीत आहेत. वयाच्या सातव्या वर्षी त्यांची शिल्पकलेशी रुजवात झाली. फक्त दुसरीपर्यंतचे त्यांचे शिक्षण झालेले असले तरी त्यांचे वाचन, चिंतन, जिद्द, कष्ट अपार आहेत. २0 डिसेंबर २000 ला त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. तरीही गेल्या ११ वर्षांत त्यांनी केवळ डाव्या हाताच्या मदतीने शिवछत्रपतींचे ११ पुतळे तयार केले. शिवछत्रपतींचे २७ पुतळे एकाच कलाकाराने तयार करण्याचा विक्रम आप्पासाहेबांनी केला आहे. सातार्यात पवई नाक्यावर बसविलेला पुतळा १९६१ मध्ये त्यांनी तयार केला. तो तयार झाल्यानंतर दत्ताे वामन पोतदार यांच्यासह अनेक इतिहास अभ्यासकांनी तो पाहिला; परंतु याच काळात पानशेत धरण फुटल्याने पुतळा वाहून गेला. आप्पासाहेबांनी जिद्दीने तो पुन्हा तयार केला. शिवाजी विद्यापीठातील साडेअठरा फुटी पुतळा आप्पासाहेबांनी एकट्याने तयार केला. फक्त माती मळून देणारे सहकारी होते. मुखवटा बनविण्याची कला त्यांनी ‘मुगलेआझम’च्या काळात आत्मसात केली. के. आसिफ यांनी त्यांना बोलावले. ‘प्यार किया तो डरना क्या’ हे सुप्रसिद्ध गाणे मधुबालावर चित्रित झाले आहे; परंतु प्रत्यक्षात ते नृत्य मधुबालाने केलेले नाही. मधुबालाचा रबरी मुखवटा आप्पासाहेबांनी तयार केला आणि तो लक्ष्मीनारायण नावाच्या नर्तकाला बसविला. १९५२ ते ६0 या काळातील मुगले आझमच्या आठवणींचा खजिना आप्पासाहेबांकडे आहे. या प्रदीर्घ कलाजीवनाचा राष्ट्रीय स्तरावर कोणताही गौरव झालेला नसताना माती आणि पंचधातूंच्या संगतीत या कलावंताची वयाच्या ८६व्या वर्षीही साधना सुरूअसते. - डी. एस. खटावकर (ज्येष्ठ चित्रकार) दोस्त समुद्र, समुद्रकिनारा हा किशोरचा अत्यंत विक पॉइंट. आईबाबतही तो अतिशय हळवा आहे. त्याचा आणखी एक विक पॉइंट म्हणजे त्याचे मित्र. त्यांच्यासाठी अगदी जिवाला जीव देण्याचीही त्याची तयारी असते. त्याच्या कल्पनांना वेळकाळाच्या र्मयादा नसतात. मित्रांना कधी अगदी मध्यरात्री त्याचा फोन जाईल किंवा भल्या पहाटे. ‘उठलास ना, मग आता बॅग घेऊन तासाभरात निघ. बाकीचं नंतर सांगतो.’ समुद्रकिनार्यांवरच्या गेस्ट हाउसमध्ये अशा अनेक रात्री मग त्याने मित्रांच्या साथीने चिरंजीव केल्या आहेत. कवितांची मैफल, गप्पा, चर्चा, हास्यविनोद. यात तास, दिवस, रात्री कशा संपतात ते कळतच नाही. बॅग भरून घेऊन आलेल्या डीव्हीडींच्या त्याच्या पोतडीतून देश-विदेशातले उत्तमोत्तम चित्रपटही बाहेर पडतात. ‘नवं’ जे काही असेल ते इतरांना सांगायला, इतरांकडून शेअर करायला त्याला प्रचंड आवडतं. त्यासाठीही कोणतीही वेळ काळ त्याला बंधनं घालू शकत नाहीत. स्वत:ची नवी कविता जेवढय़ा उत्सुकतेनं तो ऐकवतो, त्यापेक्षा अधिक उत्सुकतेनं इतरांची चांगली कविता, पुस्तक, कांदबरी तो ऐकवतो. त्याचं वाचन अफाट आहे. तेवढंच मनन आणि चिंतनही. तो भटक्या प्रवासी तर आहेच; पण तो उत्तम खवय्या आणि स्वयंपाकीही आहे. मित्रांबरोबर घराबाहेर पडला की ‘चाकोरी’तून तो स्वत:ला पूर्णपणे डिस्कनेक्ट करतो. दोन-तीन दिवस अगदी मोबाईलही पूर्णपणे बंद ! साहित्य, चित्रपट, संगीत आणि मित्रांच्या सोबतीत स्वत: हरवून जायचं आणि इतरांनाही तोच अनुभव द्यायचा. मनावरची, अंगावरची सगळी ‘जळमटं’ झटकायची, नव्या ऊर्जेनं ताजंतवानं व्हायचं, कैफात राहायचं आणि कैफात जगायचं. खेड्यात भटकायचं, अगदी स्वत:च बाजारात जाऊन भलीमोठी भाजी खरेदी करायची, स्वत:च्याच हातानं चवदार स्वयंपाक करायचा, चवीनं तो खायचा आणि खिलवायचाही. त्याच्या माणूसपणाची आणि मैत्रीची ही चव उतरणारी नसतेच. - प्रकाश होळकर (कवी, गीतकार) एक नया मकाम ‘मालेगाव का सुपरमॅन’च्या निर्मितीविषयी मी पहिल्यांदा कुठल्या तरी चॅनलवर एक इंण्टरव्ह्यू पाहिला. अजब वाटलं मला ते सारं. तोपर्यंत मला माहितीही नव्हतं की, मालेगाव नक्की आहे कुठे.! मी उठलो आणि सरळ मालेगावात गेलो. तिथं नासीर शेखला कोण ओळखत नव्हतं.? - सगळं गावच सिनेमावेडं. नासीर पहिल्यांदा भेटला भररस्त्यात, कुठून तरी मोटारसायकलवर येत होता. घामानं ओला गच्च. पण सिनेमा म्हणताच, त्याला अशी काही तरतरी आली की भर उन्हात तो भरभरून बोलू लागला. त्याक्षणी वाटलं की, ‘इस बंदे का सिनेमा के लिए पॅशन अनबिलिव्हेबल है.!’ सिनेमाच्या वेडापायी घरदार, असेल-नसेल ते किडूकमिडूक सगळं गहाण टाकायची त्याची तयारी होती, काही गोष्टी तर त्यानं आधीच विकल्या होत्या. त्याच्या डोक्यात कायम ‘सिनेमा’ भरलेला. ‘पिक्चर’ या शब्दापलीकडे त्याला दुसरं काहीच सुचत नाही, दिसतही नाही. तासन्तास तो सिनेमाविषयी बोलू शकतो. बोलतो. त्याचे सिनेमे हे वरकरणी बॉलिवूड सिनेमेचे रिमेक वाटत असले तरी ते तसे नाहीत, अत्यंत अस्सल आणि नवं काम आहे त्याचं. त्या सिनेमाच्या थिम, त्यातली विनोदी गुंफण, त्यातले संवाद हे सगळं अत्यंत कल्पक आणि ओरिजनल आहे.! ‘ जिसकी कभी कोई मंझिल ही नहीं थी, उस सफर पे निकल पडा ये बंदा. और देखो उसका खुदका एक मकाम है.! मी त्याचा ‘सुपरमॅन’ विकत घेतला आणि आता ‘मालेगाव का स्पायडरमॅन’ या नव्या सिनेमाचीही निर्मितीही मी करतोय. ‘सुपरमॅन’ लवरकच देशभरातल्या काही निवडक मल्टिप्लेक्समधे प्रदर्शित होईल. मी खरंच सांगतो, नासीर आणि त्याचा हा सिनेमा भारतीय सिनेमाच्या भविष्यात स्वत:ची एक खास जागा तयार करतील, हे नक्की ! - सुनील बोरा (हिंदी चित्रपट निर्माते) जिद्दीची हद्द वीरधवलचं सर्वांत मोठं बलस्थान म्हणजे त्याची जिद्द. त्याचबरोबर शिकण्याची आणि जिंकण्याची त्याची ईर्षा. त्याच्या बाजूने जमेच्या आणखी दोन बाजू आहेत त्या म्हणजे त्याची उंची आणि त्याचं वय. त्याच्या डोक्यात रात्रंदिवस विचार असतो तो फक्त जलतरणाचाच. महाराष्ट्रात आजही जलतरणात वर्चस्व आहे ते मुंबई, पुण्याचं; पण कोल्हापूरसारख्या निमशहरी ठिकाणी असतानाही त्यानं आपली छाप पाडली; पण त्याला आणखी पुढे झेप घ्यायची होती. त्याच ओढीपोटी तो बंगळूरूला आला. २00५ पासून मी वीरधवलला कोचिंग करतोय. अतिव आत्मविश्वास, पराकोटीची मेहनत घेण्याची तयारी आणि स्वत:वरच विजय मिळविण्याची पराकाष्ठा. या अत्यंत दुर्मिळ गोष्टी त्याच्याकडे आहेत. जगातल्या कुठल्याही नामवंत जलतरणपटूकडे असणारी गुणवत्ता त्याच्याहीकडे आहे. कुठल्याच बाबतीत तो कमी नाही. हव्यात फक्त सुविधा आणि अनुभव. तोच त्याला देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. कुठलीही गोष्ट तो इतक्या झटकन आत्मसात करतो की, आश्चर्य वाटावं. त्यात परिपूर्णता आणणं हाच त्याचा ध्यास असतो. त्यासाठी तासन्तास तो सराव करतो. त्याची हीच जिद्द, लगान त्याला ऑलिम्पिकमध्येही निश्चितच पदक मिळवून देईल. भारताचं तर तो आशास्थान आहेच; पण जगातल्याही अनेक जलतरणपटूंचं त्याच्या प्रवासाकडे लक्ष आहे. यातूनच त्याच्यातली गुणवत्ता अधोरेखित होते. - निहार अमीन (आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतरण प्रशिक्षक)